शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज केली खंडित

By admin | Updated: January 15, 2017 23:22 IST

जालना/वडीगोद्री :वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

जालना/वडीगोद्री : महावितरण कंपनीने थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. शहर परिसरातील वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. वडीगोद्री परिसरात थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण राबवित आहे. याचा ‘झटका’ वीस गावांच्या पाणी योजनांनाही बसला आहे. वडीगोद्री परिसरातील वीज बिल थकीत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचेही वीज तोडण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांना भर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या थकीत बिलाचा आकडा ३० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गतवर्षीपासून वीज बील न भरणाऱ्या ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारी दिवसभर वडीगोद्री परिसरातील २० गावांचा पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. रविवारी सुटीमुळे ही मोहीम बंद ठेवली असली तरी सोमवारपासून उर्वरित गावांत मोहीम तीव्र करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत काही प्रमाणात का होईना वीज बिलांचा भरणा करीत होती. मात्र, मागील वर्षीपासून अनेक ग्रामपंचयातींनी वीज बिल भरणाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण घटले आहे. यासोबतच थकबाकीत असलेले व्यावसाईक, औद्योगिक तसेच सरकारी कार्यालये घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरूध्दही ही मोहीम सुरू केली असून, ती मार्च अखेरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)