शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणूक प्रक्रियेत वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:58 IST

रामपंचायतीच्या प्रशासकीय निवडणूक कामादरम्यान वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या अभियंत्यावर निवडणूक कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र तहसीलदार महेश सावंत यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय निवडणूक कामादरम्यान वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या अभियंत्यावर निवडणूक कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र तहसीलदार महेश सावंत यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिले आहे.दरम्यान, याबाबत तहसीलदारांनी स्वत: ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, अशी सूचना पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तहसीलदारांना दिली असून रात्री उशिरापर्यंत तहसीलदार सावंत पोलीस ठाण्यात न आल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकाराने महसूल व महावितरण या दोन विभागात चांगलीच जुंपल्याची चर्चा होत आहे. तहसीलदारांच्या पत्रात म्हटले आहे की, पैठण येथील सहायक अभियंत्यांना तालुक्यात २२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरू असून प्रशासकीय तयारी करण्यात येत असल्याने पैठण तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवावा अशा सूचना व लेखी पत्र देऊन कळविण्यात आल्या; परंतु त्यांनी या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली. या प्रकाराने निवडणूक कामात अडथळा आला आहे. निवडणूक आयोगानेही निवडणूक काळात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरणला निर्देशित केले आहे. ४ रोजी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ईव्हीएम मशिन शिलिंग प्रक्रिया रात्री २.३० पर्यंत करावी लागली. यामुळे निवडणूक कामात मोठा अडथळा निर्माण झाला. ५ रोजी दुपारनंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुठलेही आदेश निर्गमित करता आले नाही, असे सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे महावितरणच्या संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रात केली आहे. आता काय कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.