शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

त्या संचालकांची निवड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:02 IST

गंगापूर : तालुका शिक्षक पतसंस्थेत अध्यक्षांनी केलेल्या दोन तज्ज्ञ संचालकांची निवड सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गंगापूर यांनी नियमबाह्य ठरवत ...

गंगापूर : तालुका शिक्षक पतसंस्थेत अध्यक्षांनी केलेल्या दोन तज्ज्ञ संचालकांची निवड सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गंगापूर यांनी नियमबाह्य ठरवत ती रद्द करण्याचे आदेश दिले. याबाबत विरोधी गटाच्या सदस्यांनी तक्रार दाखल केल्याने त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गंगापूर तालुका शिक्षक पतसंस्थेतील राजकारण पुन्हा एकदा समोर आले.

पतसंस्थेत काही महिन्यांपूर्वी अध्यक्षांनी तज्ज्ञ संचालक म्हणून शेख सत्तार शेख सरदार आणि अनिल वाकचौरे यांची निवड केली होती, पण संबंधित निवडप्रक्रिया नियमबाह्य असल्याची तक्रार संचालक राजेश हिवाळे, अंकुश जाधव, सतीश कबाडे, जालींदर चव्हाण, संजय भडके यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गंगापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर सहाय्यक निबंधकांनी शहनिशा करत संबंधित निवड नियमबाह्य ठरवत ती रद्द करण्याचे आदेश पतसंस्थेच्या अध्यक्षांसह सचिवांना दोन महिन्यांपूर्वीच दिले होते. मात्र, याकडे संबंधितांनी चालढकल केल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी पुन्हा संबंधित आदेशाचे स्मरण करून देत केलेली निवड रद्द करण्याचे कळविले. त्यामुळे अध्यक्षांनी संबंधित निवड नुकतीच रद्द केली आहे. तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेल्या संचालकांची निवड नियमबाह्य असताना त्यांनी पतसंस्थेच्या मासिक बैठकीत हजेरी लावल्याचे पुढे येत आहे. यासह त्यांना बैठक भत्ता सुद्धा अदा करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार करण्याच्या दृष्टीने विरोधक पुढे येत आहेत.

---