औरंगाबाद : समाजकल्याण विभागाने वसतिगृह प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरूकेली आहे. यामध्ये वसतिगृह निवडीला प्राधान्य दिल्यामुळे कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहे. जास्त गुण असणारे विद्यार्थी वंचित राहत आहेत.जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशाची निवड यादी आॅनलाईन लावण्यात आली आहे. त्यामध्ये कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर ८० ते ९० टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.विद्यार्थी समाजकल्याण विभागात निवड यादीविषयी माहिती विचारण्यासाठी गेल्यास त्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यालयात विद्यार्थ्यांची निवड यादी फलकावर लावण्यात येत नसल्यामुळे निवडीची माहिती मिळत नाही. यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नेटवर पैसे खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या यादीत विद्यार्थ्यांच्या गुणांचा उल्लेख नसल्यामुळे निवड कोणत्या आधारावर केली, असा प्रश्न विद्यार्थी करीत आहेत. समाजकल्याणच्या नव्या धोरणामुळे गुणवत्ता असणारे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. निवड यादीतील चुका दुरुस्त करून पुन्हा यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
समाजकल्याणच्या धोरणामुळे वसतिगृह प्रवेशापासून विद्यार्थी वंचित
By admin | Updated: August 31, 2014 00:41 IST