शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी योजना बनली विकलांग !

By admin | Updated: November 19, 2015 00:23 IST

उस्मानाबाद : अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन जगता यावे, या उद्देशाने शासनाने अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली.

उस्मानाबाद : अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन जगता यावे, या उद्देशाने शासनाने अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली. परंतु, ही योजना सुरू झाल्यापासून एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयात धूळखात पडून आहेत.अपंग व अव्यंग विवाहितांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाने सन २०१४ मध्ये संबंधित योजना सुरू केली. त्यानुसार अंमलबजावणीचे आदेशही दिले. समाजकल्याण विभागाकडून या योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवातदेखील केली. त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे २१ प्रस्ताव दाखल झाले होते. यांना अर्थसहाय्य देण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी केली होती. परंतु, निधी मिळाला नाही. पहिल्याच वर्षातील प्रस्ताव निधीअभावी धूळखात पडून असल्याने २०१५-१६ या वर्षामध्ये प्रस्तावांची संख्या घटली आहे. आजअखेर केवळ १० प्रस्ताव दाखल झाले आहेत. हे सर्व प्रस्ताव प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. समाजकल्याण विभागाकडून याबाबत पाठपुरवा करण्यात आला असला तरी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, योजना सुरू झाल्यापासून छदामही उपलब्ध झाला नसल्याने ही योजनाच अडचणीत सापडली आहे. (प्रतिनिधी)