शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची दिशा ग्रामपंचायतींच्या हाती

By admin | Updated: June 25, 2016 00:44 IST

औरंगाबाद : गावांचा शाश्वत विकास अभिप्रेत आहे. या उद्देशानेच १४ व्या वित्त आयोगाचा ५४ कोटींचा पहिला ह प्ता सहा महिन्यांपूर्वीच थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला

औरंगाबाद : गावांचा शाश्वत विकास अभिप्रेत आहे. या उद्देशानेच १४ व्या वित्त आयोगाचा ५४ कोटींचा पहिला हप्ता सहा महिन्यांपूर्वीच थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला. मात्र, ‘आमचं गाव आमचा विकास’ या माध्यमातून अगोदर ग्रामपंचायतींना चार वर्षांचा बृहत आराखडा तयार करावा लागेल.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी जि. प. सदस्य, पदाधिकाऱ्यांसाठी ग्रामपंचायतींच्या विकासासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती़ मात्र, ६० पैकी अवघ्या ११ सदस्यांनी हजेरी लावली. बैठकीस आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपाध्यक्ष दिनकर पवार, बांधकाम व अर्थ समिती सभापती संतोष जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती शीला चव्हाण, दीपक राजपूत, मनाजी मिसाळ, शैलेश क्षीरसागर, उज्ज्वला सोनवणे, अनुराधा चव्हाण, पुष्पा जाधव, शोभा नलावडे, विमल बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके या सदस्यांनी हजेरी लावली. यावेळी ‘आमचं गाव आमचा विकास’ यासंबंधी प्रशिक्षक जयप्रकाश बागडे यांनी मार्गदर्शन केले़केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा केवळ ३० टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला मिळत होता. कालांतराने यात बदल होऊन तो ७० टक्के निधी मिळू लागला. आता ग्रामपंचायतींना थेट १०० टक्के निधी मिळाला आहे. यामधून जिल्हा परिषद, पंचायत समितीला वगळण्यात आले आहे. गावचा विकास साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने ही भूमिका घेतली आहे़ याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, गाव पातळीपासून जिल्हास्तरापर्यंतचा समावेश करण्यात आला़ चार वर्षांचा बृहत आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.