शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची धूम, पोलीस घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद: वाहनचोरी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी होत असल्याने चोरट्यांची धूम सुरूच आहे. दोन दिवसांत चोरट्यांनी ९ दुचाकी पळविल्याचे समोर ...

औरंगाबाद: वाहनचोरी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी होत असल्याने चोरट्यांची धूम सुरूच आहे. दोन दिवसांत चोरट्यांनी ९ दुचाकी पळविल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.

युनूस शब्बीर खान पठाण (रा. चौकावाडी) यांची दुचाकी (एमएच २० सीए ६८७५) सिटीचौक परिसरातून चोरट्यांनी २४ जून रोजी रात्री पळवली. बंजारा कॉलनीतील प्रकाशचंद भवरलालजी बाटींया जैन यांच्या घरासमोरून चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एमएच-२०बीके १६२५) लंपास केली. दिलीप भीमराव काळे यांनी उस्मानपुऱ्यातील रेल्वे पोस्ट कार्यालयाजवळ उभी केलेली मोटारसायकल (एमएच २०एके ३५५०) चोरट्यांनी पळवली. गारखेड्यातील रिलायन्स मॉलसमोरून एका महिलेची दुचाकी (एमएच-२०सीक्यू ६५२५) चोरट्यांनी चोरून नेली. मध्यवर्ती बसस्थानकासमोर उभी शुभम रावसाहेब काळे (रा. पडेगाव) यांची दुचाकी (एमएच-२०बीव्ही ०२४०) चोरीस गेली. एमजीएम रुग्णालयाच्या गेटसमाेरून चोरट्यांनी संजय सोनाजी रगडे यांची मोटारसायकल (एमएच-२०डीएक्स १४३८) पळवली. चोरट्यांनी करोडीतून एक दुचाकी (एमएच-२०एफके ६४८९) पळवली.

चौकट

कारही पळवली

वैजापुरातील शेख राजू शेख बाबूलाल यांची कार (एमएच ०६ए डब्ल्यू ७८३३) घाटी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून चोरी झाली.