शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

धारुर, गेवराई तालुक्यांत आगीचे थैमान; लाखोंची हानी

By admin | Updated: May 4, 2016 00:06 IST

धारुर/गेवराई : धारूर शहरातील कजबा विभागातील धनगरवाडा भागात व गेवराई तालुक्यातील तळवट बोरगावात मंगळवारी आगीने थैमान घातले.

दुष्काळात होरपळ : कडबा, शेती उपयोगी साहित्य भक्ष्यस्थानीधारुर/गेवराई : धारूर शहरातील कजबा विभागातील धनगरवाडा भागात व गेवराई तालुक्यातील तळवट बोरगावात मंगळवारी आगीने थैमान घातले. दोन्ही ठिकाणच्या घटनेत लाखोंची हानी झाली आहे. कजबा विभागातील धनगरवाडा परिसरात जुन्या वाड्यात असणाऱ्या यशवंत लक्ष्मण गायके, वचिष्ठ लक्ष्मण गायके व कृष्णा दगडू शेळके यांच्या कडब्याच्या गंजी लावल्या होत्या. दुपारी अचानक आग लागल्याने चारही गंजी जळून खाक झाल्या. शेती उपयोगी अवजारे देखील भक्ष्यस्थानी सापडले. यात ४ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. या आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी शहरातील युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. नगरपालिकेचे अग्निशामक दल व खाजगी टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. जनावरे वाड्याबाहेर काढल्याने वाचली. महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील तळवट बोरगांव येथील दोन शेतकऱ्यांच्या ५ गंजीला आग लागून २ गोठे, २ बैलगाडीसह कडबा कुट्टी जळून खाक झाली. दादाराव घोलप व चंद्रकांत घोलप यांचे गावालगत शेत आहे. त्यांच्या पाच गंजींचा आगीत कोळसा झाला. आग विझवण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमनदलाचा बंब पाचारण केला होता. मात्र तोपर्यंत काहीच शिल्लक राहिले नव्हते. दोन्ही घटनेतील आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. (वार्ताहर)