शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 13, 2014 01:07 IST

लातूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी लातूर जिल्हा

लातूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी लातूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला़ मोर्चात मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते़ आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने राज्य शासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या़ भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला ६० वर्षांपूर्वीपासून अनुसुचित जमातीत समाविष्ट केले आहे़ धनगर व धनगड एकच असल्याचे राज्य व केंद्र शासनाचे अनेक पुरावे असतांनाही गेल्या ६० वर्षांपासून प्रत्येक वेळी धनगर व धनगड हे वेगळे दाखवून महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ शासनाने अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवल्याने समाजाचा सर्वांगीण विकास खुंटला आहे़ त्यामुळे राज्यभर समाजात असंतोष पसरला आहे़ मोर्चात समाजबांधवांनी आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारचा निषेध केला़ तसेच राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ द्यावा, तसेच अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी लातूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली़ मोर्चात अ‍ॅड़ अण्णाराव पाटील, श्रीरंग शेवाळे, रामराव माने, बाळासाहेब होळकर, शिवाजी सुरवसे, महिंद्रनाथ भादेकर, राजपाल भंडे, गणेश हाके, अ‍ॅड़ मंचकराव डोणे, सुभाषराव लवटे, गोरोबा गाडेकर आदींचा सहभाग होता.