शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उद्या पहिला जथा जेद्दाहकडे होणार रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:22 IST

यंदा मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक भाविक हज यात्रेला जाणार आहेत. १३ आॅगस्ट रोजी चिकलठाणा विमानतळावरून ३०० भाविकांचा पहिला जथा रवाना होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी हजला जाण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. यंदा मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक भाविक हज यात्रेला जाणार आहेत. १३ आॅगस्ट रोजी चिकलठाणा विमानतळावरून ३०० भाविकांचा पहिला जथा रवाना होणार आहे. शुक्रवार सायंकाळपासून यात्रेकरू जामा मशीद येथे दाखल होण्यास सुरुवात झाली.औरंगाबादहून थेट जेद्दाहपर्यंत विमानसेवा उपलब्ध झाली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यातील हज यात्रेकरू पवित्र यात्रेला रवाना होणारआहेत.शुक्रवारी सायंकाळपासूनच हज यात्रेकरू ऐतिहासिक जामा मशीद येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी यात्रेकरूंच्या कागदपत्रांची तपासणी, पासपोर्ट देणे, सामानाची आवराआवर करण्यात येणार आहे. यात्रेकरूंना कोणताच त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मरकज-ए-हुज्जाज कमिटीच्या स्वयंसेवकांची फौज तैनात करण्यात आली आहे.रविवार १३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.५५ वाजता १५० यात्रेकरूंचे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. हज यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास राज्य हज कमिटीचे अध्यक्ष इब्राहीम भाईजान, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांची उपस्थिती राहणार आहे. रात्री ८ वाजता १५० यात्रेकरूंचे दुसरे विमान जेद्दाहकडे रवाना होणार आहे. दररोज दोन विमानांद्वारे यात्रेकरू रवाना होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे जामा मशीद ते विमानतळापर्यंत यात्रेकरूंना नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहरू भवनचा परिसरही यात्रेकरूंच्या सोयीसाठी ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती हुज्जाज कमिटीचे सदस्य साजीद अन्वर यांनी दिली.