शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून विकास

By admin | Updated: February 19, 2016 00:38 IST

टीम लोकमत , अंभोरा चोहोबाजूंनी डोंगर... वृक्षवेली... थूई- थूई नाचणारे मोर... व पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट... निसर्गाची अशी मुक्त उधळण झालेल्या अंभोरा (ता. आष्टी) या गावाने

टीम लोकमत , अंभोरा चोहोबाजूंनी डोंगर... वृक्षवेली... थूई- थूई नाचणारे मोर... व पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट... निसर्गाची अशी मुक्त उधळण झालेल्या अंभोरा (ता. आष्टी) या गावाने लोकसहभागातून विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. चारशे उंबरठे व २२०० लोकसंख्येच्या या गावातील बहुतांश कामे लोकवर्गणीतून साकारली आहेत. विकासाला लोकसहभागाची जोड देत गावाने तालुक्यात छाप सोडली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात पोलीस ठाणे, टेलीफोन कार्यालय, हायस्कूल विकासाची साक्ष देतात. गावातील गुळगुळीत रस्ता गाव विकासाच्या ‘मार्गा’वर असल्याचे सांगून जातो. ठाणे आहे;पण गावातील वाद कधी ठाण्यापर्यंत जात नाहीत हे वैशिष्ट्य! विविध जाती- धर्मांचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. रस्ते, पाणी, दिवे या मूलभूत सुविधांची वाणवा नाही. मात्र, गावाभोवताली डोंगर परिसर असल्याने पाणलोटची कामे व्हावीत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा. ज्वारी, बाजरी, कांदा व फळबागा ही शिवारातील प्रमुख पिके! जलयुक्त शिवार योजनेत गावचा समावेश केल्यास कृषीउत्पन्नात वाढ होईल, असा गावकऱ्यांना विश्वास वाटतो. श्री. अंबेश्वर महादेवाचे यादवकालीन मंदिर गावचा एैतिहासिक वारसा जपणारे आहे. भाविकांच्या हाकेला घावून येणारे देवस्थान म्हणून या मंदिराची परिसरात ख्याती आहे. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात. मंदिर विकास लोकसहभागातून श्री अंबेश्वर मंदिराच्या विकासासाठी गावकऱ्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. अख्खे गाव एकत्रित आले अन् कुवतीप्रमाणे निधी उभा केला. यातून जीर्णोद्धार, संरक्षक भिंत, सुशोभिकरण, रंगरंगोटी आदी कामे पूर्ण करण्यात आली. अपुरी पोलीस निवासस्थाने अंभोरा ठाण्यात ४० कर्मचारी आहेत. ठाण्यांतर्गत ८५ गावांचा भार आहे. केवळ चार ते पाच कर्मचारी राहू शकतील एवढी निवासस्थाने आहेत. इतर कर्मचाऱ्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागते. काहीजण आष्टी, अहमदनगर व शेजारच्या गावात राहून ये-जा करतात.