शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:03 IST

खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामु‌ळे नागरिकांना ...

खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामु‌ळे नागरिकांना या खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, तो त्रासदायक ठरत आहे. औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

खुलताबाद तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी यांना सोयीचा असलेला आणि खुलताबाद तालुक्यातील बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा-औरंगाबाद रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रस्ता रोको, धरणे आंदोलन केले होते. परिणामी महाराष्ट्र शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून डांबरीकरणाचे काम अर्धवट झालेले आहे. रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरण करणे बाकी आहे. तसेच गोळेगाव ते काटशिवरी हा दोन किलोमीटर रस्ता केवळ मातीचा भराव घालून अर्धवट सोडण्यात आला आहे, तर ओहर गावापासून शहरापर्यंत रस्त्यात जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय वाढली आहे. या रस्त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा असल्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी, औरंगाबाद शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. परंतु रस्ता खराब असल्याने रात्री-अपरात्री नागरिकांची, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यांचे उर्वरित काम त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी हे गंगापूर तालुक्यातील असल्याने त्यांचेे खुलताबाद तालुक्यातील विकासकामांकडे सतत दुर्लक्ष होत असते. खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद- म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा, खुलताबाद ते फुलंब्री या मार्गाचे काम जाणूनबुजून पूर्ण केले जात नाही. धामणगाव -लोणी -बोडखा , खुलताबाद- खिर्डी, वेरूळ, दावल ते धुळे राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. या रस्त्यांच्या कामांना सुरू होऊन दोन ते तीन वर्षे होत आहेत. तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे जिवंतपणी मरणयातना भोगत आहे.