शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

महिलेसह दोन बालकांना डेंग्यू

By admin | Updated: September 14, 2015 00:47 IST

नळदुर्ग : शहरातील वसंतनगर, कारखाना परिसरातील एका महिलेसह दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर,

नळदुर्ग : शहरातील वसंतनगर, कारखाना परिसरातील एका महिलेसह दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर, उमरगा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ डेंग्यूसारख्या आजाराची लागण झालेली असतानाही पालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याकडे व आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपायोजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ नळदुर्ग शहरातील वसंतनगर भागात मागील काही दिवसांपासून बालकांना मोठ्या प्रमाणात तापीची लागण होत आहे़ यातील बहुतांश रूग्ण हे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत़ येथील आरोग्य केंद्रातील रिक्तपदांमुळे २५ हजार लोकवस्तीच्या नळदुर्ग शहराबरोबरच परिसरातील १४ गावांतील रूग्णांसह नातेवाईकांची वेळप्रसंगी मोठी गैरसोय होते़ ग्रामीण भागातील नागरिकांनाही खासगी रूग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे़ पालिका प्रशासनाकडून मागील काही महिन्यांपासून शहरासह परिसरातील नाल्यांमधील घाण काढण्यात आलेली नाही़ शिवाय किटकनाशकेही टाकण्यात आलेली नाहीत़ परिणामी शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे़ त्यातच वसंतनगर व परिसरातील बालकांना मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापीची लागण झाली आहे़ यातील एका महिलेसह दोन बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे़ त्या रूग्णांना तातडीने सोलापूर व उमरगा येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़ डेंग्यूसारख्या गंभीर आजाराची लागण झालेली असतानाही अद्याप नगर पालिकेसह आरोग्य विभागाने आवश्यक ती पावले उचलली नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)