शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

छावणी पोलिसांची ‘दंडेलशाही’!

By admin | Updated: November 16, 2014 00:12 IST

औरंगाबाद : मयत रवींद्रच्या नातेवाईकांना पोलिसांच्या ‘दंडेलशाही’चा सामना करावा लागला.

औरंगाबाद : सावकाराच्या जाचाला वैतागून आत्महत्या करणाऱ्या रवींद्र शेषराव नलावडे (२५, रा, तारांगण, पडेगाव) याला न्याय द्या... त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकार पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करा, अशी मागणी करण्यासाठी आलेल्या मयत रवींद्रच्या नातेवाईकांना पोलिसांच्या ‘दंडेलशाही’चा सामना करावा लागला. पोलीस निरीक्षक जी.आर. फसले यांच्या आदेशावरून या नातेवाईकांना पोलिसांनी अक्षरश: जनावराप्रमाणे लाठ्या- काठ्यांखाली बेदम झोडपून काढले. रवींद्रने शुक्रवारी दुपारी शेजाऱ्याच्या फ्लॅटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या छातीवर, घराच्या भिंतीवर अन् एका सात पानी चिठ्ठीवर ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यात त्याने आपल्या आत्महत्येस चेतारामसिंग गुजर आणि देवसिंग गुजर (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) हे दोन सावकार जबाबदार असल्याचे लिहिले होते. व्याज आणि भिशीच्या पैशामुळे दोघांनी आपणास आत्महत्येस प्रवृत्त केले. या दोघांना अटक होईपर्यंत माझे प्रेतच उचलू नये, असे लिहिलेले होते. निष्पापांनाच ‘खाक्या’त्याचवेळी बाहेर गेलेले पोलीस निरीक्षक फसले तेथे पोहोचले. नातेवाईकांना बघून ‘तुम्हाला सांगितले ना, तुम्ही येथून बाहेर होता की नाही,’ अशा भाषेत निरीक्षकांनी न्यायासाठी बसलेल्या नातेवाईकांना ‘खाक्या’ दाखविला. आधी गुन्हा नोंदवा, अशी मागणी नातेवाईकांनी करताच ‘घ्या रे यांना’ असे फर्मान पोलीस निरीक्षक फसले यांनी सोडले अन् त्यांच्या सोबत असलेले पोलीस मग हाती पडलेल्या चार- पाच निष्पाप नातेवाईकांवर तुटून पडले. लाठ्या- काठ्यांनी बेदम मारहाण करीत पोलीस चार जणांना ठाण्यात घेऊन गेले आणि आतही कपडे काढून बेदम मारहाण करण्यात आली. पुन्हा निरीक्षक फसले ठाण्याच्या बाहेर येऊन पळालेल्या नोतवाईकांना ‘आणखी कुणाला यायचे का आत,’ असे म्हणू लागले. आपल्यालाही पोलीस पकडतील आणि मारहाण करतील, या भीतीपोटी इतर नातेवाईक दूर जाऊन थांबले. मग पकडून आत नेलेल्या चौघांना काहीवेळ मारहाण केल्यानंतर पोलिसांनी ठाण्यातून हुसकावून लावले. पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समजल्यानंतर रवींद्रचे इतर नातेवाईकही छावणी ठाण्यासमोर पोहोचले.नातेवाईकांच्या बाजूने आ. हर्षवर्धन जाधवही तेथे आले. प्रकरण गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक फसले आणि छावणी पोलिसांचा नूरच बदलला.