शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

चित्रफीत दाखवून शरीरसुखाची मागणी

By admin | Updated: September 7, 2014 00:42 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला तेथीलच एक डॉक्टर अश्लील चित्रफीत दाखवून गेल्या अनेक महिन्यांपासून शरीरसुखाची मागणी करीत होता.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला तेथीलच एक डॉक्टर अश्लील चित्रफीत दाखवून गेल्या अनेक महिन्यांपासून शरीरसुखाची मागणी करीत होता. डॉक्टराच्या या चाळ्यांना वैतागलेल्या महिलेने शनिवारी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून हे कृत्य करणाऱ्या डॉ. अतुल गणपत भालेराव (रा. चेतक घोड्याजवळ, जवाहर कॉलनी) याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रहिवासी असलेली एक महिला घाटी रुग्णालयात डॉक्टर होती. तिच्याच विभागात आरोपी डॉ. भालेराव हाही त्यावेळी कार्यरत होता. ड्यूटीच्या वेळी हा तिला अश्लील चित्रफीत दाखवीत असे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. नंतर मात्र, भालेराव तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. त्याच्या या चाळ्याला ती वैतागून गेली होती. तो तिच्या घरीही येऊन चाळे करू लागला.हा प्रकार महिलेच्या पतीला समजला. तेव्हा पतीने त्याला जाब विचारला असता भालेरावने तिला व तिच्या पतीलाही मारहाण केली. शेवटी या महिलेने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले आणि विनयभंगाची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल केल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी या आरोपी डॉ. भालेरावला अटक केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.