शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

भारतीय संविधानामुळेच लोकशाही सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक संविधानात काही मौलिक तरतुदी केल्या आहेत. विशेषतः लोकशाहीच्या ...

औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक संविधानात काही मौलिक तरतुदी केल्या आहेत. विशेषतः लोकशाहीच्या स्तंभाबद्दल अत्यंत सजगपणे ‘चेक्स ॲण्ड बॅलन्स’ पद्धतीने अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे सत्तर वर्षांनंतरही आपली लोकशाही सक्षमपणे काम करत आहे, असे प्रतिपादन माजी माहिती संचालक अजय अंबेकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमतज्ज्ञ अजय अंबेकर व ज्योती अंबेकर यांचे शनिवारी ‘प्रशासकीय व संवाद कौशल्ये’ या विषयावर ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जनसंवादतज्ज्ञ अजय अंबेकर यांनी ‘पब्लिक अ‍ॅण्ड गुड गव्हर्नन्स’ या विषयावर, तर प्रख्यात निवेदिका ज्योती अंबेकर यांनी ‘प्रभावी संवादासाठी कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्योती अंबेकर म्हणाल्या, बारा कोसावर भाषा बदलते म्हणतात, प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. आपण तो जतन करून ठेवला पाहिजे. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी प्रत्येकाने आपला आवाज, उच्चार, सादरीकरण या साऱ्याचा रियाज केला पाहिजे.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, मनुष्य हा आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. अनुभवातून, ज्ञानातून तो शिकतो आणि स्वतःमध्ये बदल करून घेतो व त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व घडत असते.

या कार्यक्रमात प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीश काळे यांनी बासरीवादन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. प्रतिभा अहिरे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.