शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा १ जुलैपासून सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात चढत असलेला उन्हाचा पारा, भारनियमन आणि पाणी या समस्या लक्षात घेता इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा या १ जुलैपासून सुरू

जालना : शहरासह जिल्ह्यात चढत असलेला उन्हाचा पारा, भारनियमन आणि पाणी या समस्या लक्षात घेता इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा या १ जुलैपासून सुरू कराव्यात, किंवा अर्धवेळ कराव्यात, अशी मागणी लायन्स क्लब आॅफ जालना गोल्डच्या वतीने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या एका निवेदनाव्दारे करण्यात आली.सध्या शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत आहे. अधूनमधून निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड जाणवत आहे. लहानमुला-बाळांसह आबालवृद्ध हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमांच्या शाळा २ आणि ९ जूनपासून सुरू झाल्या आहेत. तर मराठी माध्यमांच्या शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत.इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उकाडा, भारनिमयनासह पाण्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी १० वाजेपासून कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. आबालवृद्धांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वर्गातील गर्दी, बाहेर कडक उन्ह, प्रचंड उकाडा, उष्ण वाफ यामुळे चिमुकले पुरते हैराण झालेले आहेत. परिणामी वॉटरबॅगमधील पाणी ही अपुरे पडत आहे. उष्णता, उकाडा, भारनियमनामुळे चिमुकले बेहाल झाले आहेत, असे मत या संघटनेने सादर केलेल्या निवेदनाव्दारे व्यक्त केले.लायन्स क्लब आॅफ जालना गोल्डच्या पदाधिकारी व सदस्यांनी इंग्रजी शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर अनेक भयावह बाबी समोर आल्या आहेत, असे म्हटले.बहुतांश शाळांमध्ये इन्व्हर्टर असूनही ते बंद किंवा वापरात नाही. विद्यार्थ्यांचे उकाड्यामुळे हैराण होत आहेत. उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड होत आहे. उलटपक्षी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या कक्षात एसी सुरू असतात.सर्वच शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. परंतु पाणीही लवकर संपत आहे. ‘पाणी भरले होते ते संपले’, असे उत्तर विद्यार्थ्यांना मिळत आहे. पाणी संपल्याचे सांगून मुख्याध्यापक, प्राचार्य मोकळे होत असले तरी, शालेय व्यवस्थापनाकडून पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात येत नाही. भारनियमनामुळे पंखे बंद होतात. उकाड्यामुळे शाळेत बसवले जात नाही, अशा तक्रारी विद्यार्थी पालकांकडे करत असल्याचे शिष्टमंडळाने म्हटले. ही बाब विचारात घेऊन उन्हाळी सुट्या १ जुलैपर्यंत पुढे ढकलाव्यात किंवा अर्धावेळ शाळा कराव्यात, इंग्रजी माध्यमांच्या शाळा १ जुलैपर्यंत बंद ठेवाव्यात, अशी मागणी क्लबचे अध्यक्ष सुभाष देविदान, विजय कागलीवाल, नंदकिशोर गोयल, रामकुंवर अग्रवाल, पंकज गेल्डा, मोहन गुप्ता आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे बेहालउन्हामुळे चक्कर येऊन पडण्याचे प्रकार वाढले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. तेथील पाणी, भारनियमनाच्या समस्या पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत सकारात्मक विचार व्हावा, असेही निवेदनात म्हटले आहे.