शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

By admin | Updated: July 20, 2015 00:54 IST

बीड / उमापूर: गेवराई तालुक्यातील उमापूर प्राथमिक आरोग्य केंंद्रात प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

बीड / उमापूर: गेवराई तालुक्यातील उमापूर प्राथमिक आरोग्य केंंद्रात प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.उज्ज्वला प्रकाश कवडे (वय २०) ही महिला पहिल्याच बाळंतपणासाठी उमापूर प्रा. आरोग्य केंंद्रात बुधवारी दाखल झाली होती. गुरुवारी त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र, रक्तस्त्राव न थांबल्याने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी वाटेतच बाळासह मातेने प्राण सोडले. चकलांबा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. प्रसुतीवेळी वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते, नर्सनेच औषधोपचार केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचेच हे बळी असल्याचा आरोप नातेवाईकांसह कार्यकर्र्त्यांनी केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी रविवारी संग्राम आहेर, धर्मराज आहेर, महादेव बन्सोडे, सुजित देशमुख, दत्ता जाधव, जयदीप औटी, किरण खरात, डॉ. संजय औटी, सुमन वीर, नितीन पवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)