निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्याच्या दरम्यान पुरवठा विभागातून शहर व तालुक्यातील रेशन दुकानांमार्फत ५८३ क्विंटल साखर वितरित करण्यासाठी देण्यात आली होती. परंतु, रेशन दुकानदारांच्या मशीनमध्ये सदरील वाटपाचे फॉरमॅटच नसल्याने ही साखर वितरणाविनाच पडून आहे. या साखरेची बाजारभावाप्रमाणे किंमत १५ लाख रुपये आहे. ही साखर लवकर वाटप न झाल्यास रेशन दुकानदार साखर खराब झाली, असे सांगून काळ्या बाजारात विक्री करण्याची शक्यता आहे. तरी लाभार्थ्यांना ही साखर वाटप करण्यासाठी पुरवठा विभागाने त्वरित नियोजन करावे, अशी मागणी नायब तहसीलदार अविनाश अंकुश यांच्याकडे एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना राहुल वानखेडे, अश्फाक सय्यद, फैसल बासोलान, इम्रान खान, साबेर जहुरी, हरून शेख, सय्यद महेमूद, वैभव खाजेकर यांची उपस्थिती होती.
रेशन दुकानातील साखर त्वरित वितरित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST