शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीच्या दोषींवर कारवाईची मागणी

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकरणात मनपाला तब्बल २३१ कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकरणात मनपाला तब्बल २३१ कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल कंत्राटदाराच्या बाजूने गेल्याने चुकीची निविदा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. एलईडीच्या कंत्राटदाराला दरमहा २ कोटी ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. याप्रकरणी बापू घडामोडे यांनी पैसे कोठून आणायचे आणि शहराचा विकास कसा करायचा असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी सविस्तर खुलासा केला. सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी अटी-शर्ती कंपनीच्या बाजूने तयार केल्या जातात, समांतरचा करारदेखील असाच एकतर्फी आहे, तत्कालीन आयुक्त निविदेवर सह्या कशा काय करतात, निविदा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. नंदकुमार घोडेले यांनी एलईडीची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्यावी अशी मागणी केली. दिलीप थोरात, माधुरी अदवंत यांनीही एलईडीच्या चर्चेत भाग घेतला. राजू शिंदे यांनी पाणीपट्टीसाठी मनपाने स्वतंत्र बँक खाते उघडून कराराचा भंग केला आहे, त्यामुळे समांतरचा निर्णयदेखील भविष्यात मनपाच्या विरोधात जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. डेंग्यूच्या आजारावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. डेंग्यूने थैमान वाढले असून, तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नंदकुमार घोडेले, ज्योती पिंजरकर, ज्योती नाडे, कीर्ती शिंदे, राज वानखेडे यांनी केली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी फवारणीसाठी ८६ कर्मचारी असून, २५ पैकी १३ फॉगिंग मशीन बंद आहेत, अशी माहिती दिली. शहरात फवारणीसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅक्टर कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांच्या अनुपस्थित सभा सांभाळणारे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी दिले. ग्रामपंचायतीच्या एनओसी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या सावंगी, तीसगाव, आडगाव, खांडेवाडी-नायगव्हाण येथील जागा ग्रामपंचायतीची एनओसी घेतल्यानंतरच अंतिम करण्यात याव्यात असा निर्णय सभेत घेण्यात आला. नंदकुमार घोडेले यांनी ग्रामपंचायतीची एनओसी असल्याशिवाय पुढील कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली.