शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे पीकविमा भरण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:33 IST

नांदेड : विमा कंपनीच्या पोर्टलमध्ये होणारे बिघाड, ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अडचणी आदीमुळे पीकविमा भरण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने विलंब होत आहे़ त्या

श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विमा कंपनीच्या पोर्टलमध्ये होणारे बिघाड, ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अडचणी आदीमुळे पीकविमा भरण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने विलंब होत आहे़ त्यामुळे सीएससी केंद्रावर आजपर्यंत केवळ ६ हजार ६६५ शेतकऱ्यांचा पीकविमा भरल्या गेला आहे़ शेतकऱ्यांच्या सोईसाठी शासनाने आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) मार्फत गावपातळीवर पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण देणे, पिकाच्या नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच नावीण्यपूर्ण व आधुनिक सामुग्री घेण्यास प्रोत्साहन मिळावे आदी उद्देशाने शेतकऱ्यांना पीकविमा दिला जातो़ प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेच्या माध्यमातून गतवर्षी पावणेआठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता़ यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा मिळाला़ त्यामुळे यंदा दहा लाख शेतकरी पीकविमा भरतील, असा अंदाज आहे़ शासनाकडून यंदा गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार (महा ई-सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्र) तसेच जिल्ह्यातील कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी)च्या १ हजार ७०० केंद्रावर पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले़ त्यामुळे बँकेच्या रांगा कमी होवून वेळेची बचत होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ सीएससी केंद्रावर सेवा उपबल्ध करून दिल्याने अनेक बँका पीकविमा भरून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत़ परिणामी सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे़ जिल्ह्यात १७०० सीएससी केंद्रावर पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले़ मात्र, प्रत्यक्षात ७१० केंद्रावर ही सुविधा उपलब्ध झाली असून त्यातील निम्म्याहून अधिक केंद्रावर अडचणी निर्माण होत आहेत़ दरम्यान, कॉमन सर्व्हीस सेंटर मध्ये पीकविमा भरण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत़ यामध्ये पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, नव्याने झालेले बदल आदीमुळे विलंब होत असल्याचे सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक असलम शेख यांनी सांगितले़