शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

२९ गावांत निर्जळी

By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST

जायकवाडी : टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण एमआयडीसीचा विद्युत पंप जळाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला आहे .

जायकवाडी : टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण एमआयडीसीचा विद्युत पंप जळाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला असून परिसरातील २९ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.जायकवाडी परिसरातील २९ गावांना ३० एप्रिलपासून एमआयडीसीच्या पॉर्इंटवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या पॉर्इंटवरून ३७ टँकरद्वारे ७१ खेपा पाणी भरले जाऊन ग्रामस्थांच्या सोयीप्रमाणे पाणी पुरविले जाते. एमआयडीसीच्या नाथसागरातील पंप हाऊसमधील विद्युत पंप सोमवारी रात्री अचानक जळाल्याने आज टँकरमध्ये पाणी भरता आले नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या या गावांत पिण्याच्या पाण्याच्या टँकरशिवाय कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्याने जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पावसाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही परिसरात पावसाचा थेंब पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. एमआयडीसीचा विद्युत पंप जळाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. परिसरातील अनेक गावांत जनतेला सध्यातरी टँकरशिवाय पर्याय नसल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले असून एमआयडीसीने टंचाईच्या काळात तात्काळ पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य भारत मुळे यांनी केली आहे. मुधलवाडी वसाहतीची सध्या टँकरच्या पाण्यावर भिस्त अवलंबून असून पाणीपुरवठ्याचे अन्य कोणतेही स्रोत टँकरशिवाय उपलब्ध नाही. टँकरचे पाणी मिळाल्यावरच जनतेची तहान भागते. याकडे एमआयडीसीने लक्ष देऊन टँकरचा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी मुधलवाडीचे सरपंच भाऊ लबडे यांनी केली. (वार्ताहर)पॉर्इंटवर टँकर रांगा लावून उभेएमआयडीसीचा पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप सोमवारी अचानक जळाल्याने आज पाण्याचे टँकर पॉर्इंटवर रांगा लावून उभे आहेत. पैठण एमआयडीसीच्या पंप हाऊसमधून दोन विद्युत पंपाद्वारे औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे एक विद्युत पंप जळाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असून येत्या दोन दिवसांत विद्युत पंप दुरुस्त करून गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली; मात्र टँकरवर भिस्त अवलंबून असलेल्या टाकळी (पैठण), मुधलवाडी वसाहत, रहाटगाव, आखातवाडा, नानेगाव, पुसेगाव, खेर्डा तांडा, यासीनपूर, करंजखेडा, पाचलगाव, सोनवाडी बु., सोनवाडी खु., डेरा, रांजणगाव दांडगा, लिंबगाव, सोलनापूर, सायगाव, दादेगाव (नवीन) रजापूर, कुतूबखेडा, दादेगाव बु., हर्षी बु., पाटेगाव, वडाळा, दादेगाव खु. चांगतपुरी, सुलतानपूर, थेरगाव, हर्षी खु., या २९ गावांतील जनतेचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल सुरू असून त्यांच्या नजरा टँकरकडे लागल्या आहेत.