शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची भिस्त नवसैनिकांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:43 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे़ दिग्गजांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यामुळे या निवडणुकीत सेनेची सर्व भिस्त नवसैनिकांवरच आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या मुलाखतीत त्याची प्रचिती येत होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे़ दिग्गजांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यामुळे या निवडणुकीत सेनेची सर्व भिस्त नवसैनिकांवरच आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या मुलाखतीत त्याची प्रचिती येत होती़मावळत्या महापालिकेत शिवसेनेकडे विरोधी पक्षनेता पद होते़ तर भाजपाचे केवळ दोन नगरसेवक होते़ त्यावेळी भाजपाला सर्व ठिकाणी उमेदवारही मिळाले नव्हते़ आज नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे़ भाजपाकडे तिकिटांसाठी एकीकडे रांगा असताना, शिवसेनेच्या गोटात मात्र सर्व काही शांत-शांत होते़ मंगळवारी प्रभाग क्रमांक १ ते १२ साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळपासून या मुलाखतीला सुरुवातही झाली, परंतु सेनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही़ काही प्रभागातील जागांसाठी तर उमेदवारच नव्हते़ पॅनलप्रमुख कोण होणार? त्याचाही वेगळा विषय आहे़ दिग्गजांनी जय महाराष्ट्र केल्यामुळे सेनेतील नवख्या कार्यकर्त्यांनी आता पक्षाकडून उमेदवारी मागितली जात आहे़ सेनेची पहिली यादी २१ सप्टेंबरच्या रात्री प्रसिद्ध केली जाणार , असे आ़ हेमंत पाटील म्हणाले़परंतु २२ सप्टेंबरपर्यंत सेना ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करेल असा अंदाज आहे़ कारण भाजपाकडून तिकीट न मिळालेले बंडखोर पुन्हा घरवापसी करु शकतात़ असाही अंदाज बांधला जात आहे़ १२ प्रभागांसाठी एकूण ३५० जणांनी सेनेकडे उमेदवारी मागितली आहे़ त्यामध्ये मंगळवारी दिवसभरात ६० जणांच्या मुलाखती झाल्याचे आ़पाटील म्हणाले़ बुधवारी प्रभाग क्रमांक १३ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत़याबाबत आ़ पाटील म्हणाले, शिवसेनेकडे शेकडो जणांनी उमेदवारी मागितली आहे़ मुस्लिमबहुल भागातूनही सेनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत़ आरपीआयसोबत युतीबाबत आमची चर्चा सुरु आहे़ कारण दलित समाजाचा आजपर्यंत काँग्रेसने वापरच केला आहे़ दलित नेतृत्व संपविण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोपही आ़ पाटील यांनी केला़