शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

महाविकास आघाडीच्या बळकटीसाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा

By | Updated: November 28, 2020 04:05 IST

औरंगाबाद : खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने ही महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपले पाच वर्षे पूर्ण ...

औरंगाबाद : खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने ही महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपले पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाविकास आघाडीला अधिक बळकट करण्यासाठी उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन गुरुवारी केले.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ रामनगर येथील सुशीलादेवी विद्यालयात आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, रवींद्र काळे, एकनाथ गवळी, शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप, कमलाकर जगताप, मनोज गांगवे, सुभाष पांडभरे, मोतीलाल जगताप, भाग्यश्री राजपूत उपस्थित होते.

देसाई म्हणाले, १६८० कोटींची पाणी योजना लवकरच मार्गी लागेल. यामुळे औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल. त्याचबरोबर मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांचा रोजगारासाठी हे महाविकास आघाडी सरकार निर्भयपणे आणि धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध आहे. पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा विधान परिषदेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन देसाई यांनी केले.

उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील पदवीधर भाजपवाल्यांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनीही मार्गदर्शन केले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा पाठिंबा

मराठवाड्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू रणजित पवार, दिनकर तेलंग (बॅटमिंटन), प्रा. एकनाथ साळुंखे (हँडबॉल), आदित्य जोशी (जिम्नॅस्टिक), राहुल तांदळे (जिम्नॅस्टिक), सागर कुलकर्णी (जिम्नॅस्टिक), दिनेश वंजारे (तलवारबाजी), सागर मगर (तलवारबाजी), डॉ. अजित पवार (जिम्नॅस्टिक), परशुराम वाखुरे (कबड्डी) यांनी सतीश चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला.