गंगापूर : लातूर तालुक्यातील गंगापूर येथील बसस्थानक , झोपडपट्टी अशा गावच्या अर्ध्या भागात गेल्या एक महिन्यापासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ या भागातील पाणीप्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे़ उर्वरित अर्ध्या गावाला ओढ्यालगतच्या पाणीपुरवठा विहिरीतून पाणीपुरवठा होत आहे़ वरच्या अर्ध्या गावाला घोल तलावातील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो़ मात्र गेल्या एक महिन्यापासून घोल तलावातील पाणीसाठा संपल्याने विहिरीत अत्यंत कमी पाणी येते़ हेच पाणी आठ -आठ दिवस साठवून एखाद्या गल्लीतील नळांना सोडले जाते़ त्यामुळे काही भागात पंधरा दिवसांतून एकदाही पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे़ग्रामसेवक व्ही़व्हीक़ुंभार यांच्याशी संपर्क साधला असता भोर तलावातील पाणीसाठा आटला आहे़ त्यामुळे पाऊस पडल्यानंतरच पाणीप्रश्न मार्गी लागेल, असे ते म्हणाले़ (वार्ताहर)
गंगापुरात तीव्र पाणीटंचाई
By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST