अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाईमराठवाड्याची शिक्षण पंढरी व प्राचीन काळापासून शिक्षणाचे माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या शिक्षण पंढरीला उतरती कळा लागली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेत नव्वद टक्क्क््यांच्या पुढे गुण प्राप्त करणारी एकमेव विद्यार्थिनी विज्ञान शाखेत आहे. ही गुणवत्तेची घसरण शहरवासियांना चिंतेत टाकणारी आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अंबाजोगाई शहर व तालुक्यात १४ उच्च माध्यमिक महाविद्यालये आहेत. अंबाजोगाई शहर हे प्राचीन काळापासूनच शिक्षणाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या शिक्षण संस्था शहरात कार्यरत आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी एक वर्षाअगोदर अंबाजोगाईचे योगेश्वरी महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयातील विद्यार्थी आज राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. हा सर्व शिक्षणाचा लौकिक असतानाही गेल्या दहा वर्षापासून अंबाजोगाई शहरातील गुणवत्तेची घसरण दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. योगेश्वरी महाविद्यालयासारख्या नामांकित संस्थेत श्रृती शामराव बारडकर या विद्यार्थिनीला ९०.७७ ट्कके गुण मिळाले व ती तालुक्यात विज्ञान शाखेत पहिली ठरली. एवढी मोठी दुरवस्था शिक्षण पंढरीची झाली आहे. या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्यसााठी पालकांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक अर्थपूर्ण व्यवहारानंतरच प्रवेशाची निश्चिती ठरते. अशाही स्थितीत गुणवत्तेकडे प्राधान्य न देता संस्थेचा विकास म्हणजे मोठमोठ्या इमारती असा नवा मतप्रवाह अंबाजोगाईत फोफावला जात आहे. मात्र, घसरत्या गुणवत्तेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी स्थिती शहरातही इतरही महाविद्यालयांची झाली आहे.लातूरकडे ओढागेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाईची गुणवत्ता घसरत चालल्याने दहावीच्या परीक्षेनंतर पालक आपल्या विद्यार्थ्याला येथे ठेवण्यापेक्षा त्याला पुढील शिक्षणासाठी लातूरला पाठविणेच पसंत करतात.
मराठवाड्याच्या शिक्षण पंढरीला उतरती कळा
By admin | Updated: June 21, 2014 00:50 IST