शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांबाबत कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:22 IST

मनपाने खुल्या जागा व इतर जागेवरील धार्मिक स्थळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच त्याबाबतचे शपथपत्र न्यायालयात सादर करावे, अशी सूचना स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाला बैठकीत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाने सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार त्या भागातील काही धार्मिक स्थळे नियमित करण्याचे धोरण निश्चित केले आहे. सिडको त्याची अंमलबजावणी करीत आहे. त्याच धर्तीवर मनपाने खुल्या जागा व इतर जागेवरील धार्मिक स्थळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच त्याबाबतचे शपथपत्र न्यायालयात सादर करावे, अशी सूचना स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाला बैठकीत केली.स्थायी समिती बैठकीत नगरसेवक राजू वैद्य, सीताराम सुरे, राजगौरव वानखेडे यांनी प्रथम धार्मिक स्थळांवरील कारवाईप्रकरणी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. संशोधन केंद्रावर धार्मिक स्थळांसंदर्भात झालेल्या बैठकीत नेमके काय झाले, याचा खुलासा नगरसेवकांनी मागितला. त्यावर विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झाली नसल्याने बैठकीत केवळ प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले. शुक्रवारी पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदस्य राजू वैद्य म्हणाले, १८ मार्च २००२ रोजी शासन आदेशानुसार सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार त्या-त्या भागात अनुज्ञेय होऊ शकतील, अशी धार्मिक स्थळे नियमित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सिडकोकडून शहरात सुरू आहे. याच धर्तीवर औरंगाबाद पालिकेनेही खुल्या जागेवरील तर इतर जागांवर असलेली धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. पालिकेच्या खुल्या जागा ज्याप्रमाणे इतरांना लीजवर देण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणचे धामिक स्थळांना लीजवर देऊन ती नियमित करण्यात यावी. असे केल्यास शहरातील ५० टक्के धार्मिक स्थळे नियमित होतील, अशी सूचना वैद्य यांनी केली. सभापतींच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी शुक्रवारच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.