सोनपेठ : येथील काँग्रेसच्या नगरसेविका विजयमाला प्रभाकर सिरसाठ यांच्या अपात्रतेच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला आहे़जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेविका सिरसाठ यांचे पती प्रभाकर सिरसाठ यांनी अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात मारोती रंजवे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरपालिकेचे सदस्यत्व अपात्र केले होते़ या निर्णयाच्या विरोधात विजयमाला सिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांकडे अपील सादर केले होते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या २० मे २०१३ च्या आदेशास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आदेश दिले होते़ मुख्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली़ २१ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निर्णय देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम केला़ रंजवे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर तीन महिन्यांत निर्णय देण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते़ सुनावणीनंतर मुख्यमंत्र्यांनी १९ जून रोजी विजयमाला सिरसाठ यांच्या नगरपालिका सदस्यत्व अपात्र प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे़ (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून कायम
By admin | Updated: June 22, 2014 00:24 IST