शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मराठवाड्यातील उच्चशिक्षणाकडे सरकारचे भयंकर दुर्लक्ष; मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय ठरले केवळ घोषणाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:44 IST

राज्य सरकारने मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४ आॅक्टोबर २०१६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घेतली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास आणि संशोधन संस्थेला १५० कोटी, जालन्याजवळ द इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि जालना, लातूर येथील तंत्रनिकेतनचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

ठळक मुद्देमराठवाड्याच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण संस्थांची उभारणी, कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना देण्यासाठी  संस्थांच्या सक्षमीकरणची गरज आहे.औरंगाबादेत विविध शैक्षणिक संस्था उभारणीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. मात्र, या संस्थांच्या विकासासाठी  निधी सरकारकडून मिळालेला नाही.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्य सरकारने मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४ आॅक्टोबर २०१६ रोजी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घेतली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास आणि संशोधन संस्थेला १५० कोटी, जालन्याजवळ द इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि जालना, लातूर येथील तंत्रनिकेतनचे अभियांत्रिकीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

मराठवाड्याच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण संस्थांची उभारणी, कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना देण्यासाठी  संस्थांच्या सक्षमीकरणची गरज आहे. औरंगाबादेत विविध शैक्षणिक संस्था उभारणीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. मात्र, या संस्थांच्या विकासासाठी  निधी सरकारकडून मिळालेला नाही.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास आणि संशोधन संस्था, द इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, तंत्रनिकेतन महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.

‘आयसीटी’ कागदावरचयाच मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यात द इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठाची शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जालनाजवळ २०० एकर जागा मंजूर केली. या जागेचे हस्तांतरणही आयसीटीकडे करण्यात आले. मात्र, इमारती, पायाभूत सुविधा देऊन संस्था कार्यान्वित करण्यासाठी एका रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही.

विधि विद्यापीठनागपूरनंतर औरंगाबादेत विधि विद्यापीठ  एक वर्षाने सुरू झाले.  मात्र, या विद्यापीठाला स्वतंत्र जागा, इमारती आणि पायाभूत सेवा-सुविधा निर्माण करण्यासाठी अद्यापही निधी देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यानी त्याकडे चक्क दुर्लक्ष केले.

गोपीनाथ मुंडे संस्था बंद पडण्याच्या मार्गावरमराठवाड्याच्या विकासात योगदान असल्यामुळे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने विद्यापीठात गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेची सुरुवात होण्यासाठी विद्यापीठाने १० कोटी रुपयांची तरतूद फंडातून केली. या जोरावर पहिल्या वर्षी संस्था कार्यान्वित झाली. ४ आॅक्टोबर २०१६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत या संस्थेसाठी १५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप एक रुपयाही दिलेला नाही. उलट मागील वर्षी सुरू झालेल्या अभ्यासक्रमाला यावर्षी एकही प्रवेश झालेला नाही. 

‘स्पा’चा निर्णय अधांतरीऔरंगाबादेत स्थापन होणारी ‘आयआयएम’ संस्था ऐनवेळी नागपूर येथे पळविण्यात आली. याविषयीचे स्पष्टीकरण देताना ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ (स्पा) संस्था औरंगाबादेत स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. याविषयी अद्यापही कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. ९ डिसेंबर २०१७ रोजी विधि विद्यापीठाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘स्पा’ लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. मात्र, यावरही पुढे काहीच झाले नाही.

दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांचा निर्णय होईनाऔरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच जालना आणि लातूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे रूपांतरण अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. केवळ लातूरच्या तंत्रनिकेतनचा प्रस्ताव एआयसीटीईकडे पाठविण्यात आला आहे. 

सायन्स पार्कडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सायन्सपार्क निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. पुढे विद्यापीठ प्रशासनाने या सायन्सपार्कची व्याप्ती वाढवत राज्य सरकारला १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावालाही राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही.

दुसर्‍या ‘पोस्ट’चा प्रश्न कायमराज्यातील सर्व विभागांमध्ये अनुदानित महाविद्यालयात प्रत्येक विषयाची दुसरी ‘पोस्ट’ भरण्यास मान्यता आहे. मात्र, मराठवाड्यातच दुसरी ‘पोस्ट’ भरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे  तासिका तत्त्वावर प्राध्यापकांच्या नेमणुका कराव्या लागतात. दुसर्‍या ‘पोस्ट’ला मान्यता दिल्यास मराठवाड्यात किमान १ हजारपेक्षा अधिक प्राध्यापकांच्या ‘पोस्ट’ नव्याने निर्माण होतील.