शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अविश्वास ठरावावर आज होणार फैसला

By admin | Updated: June 18, 2014 01:43 IST

लोहारा : शिवसेनेच्या एकहाती ताब्यात असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरूध्द दाखल अविश्वास ठरावावर बुधवारी फैसला होणार आहे़

लोहारा : शिवसेनेच्या एकहाती ताब्यात असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरूध्द दाखल अविश्वास ठरावावर बुधवारी फैसला होणार आहे़ सरपंच पतीवर आरोप करीत आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केल्याने राजकारण ढवळून निघाले आहे़ दरम्यान, आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेनेचे वरिष्ठ नेतेमंडळी ऐनवेळी हस्तक्षेप करून हा ठराव बारगळणार की सदस्य ठराव पारित करून घेणार याकडे लक्ष वेधले आहे़लोहारा ग्रामपंचायतीत १५ पैकी १० सदस्य शिवसेनेचे असून, तर काँग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचा एक असे पक्षीय बलाबल ग्रामपंचायतीत आहे़ शिवसेनेच्या सदस्यांनी नसीमाबी बागवान यांची सरपंच म्हणून निवड केली होती़ ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी सरपंच बागवान या वेळेवर मासिक बैठका, ग्रामसभा घेत नाहीत, जमा-खर्चाचा हिशोब देत नाहीत, त्यांचे पती नेहमी कामकाजात हस्तक्षेप करतात, नागरिकांना सुविधा देण्यात कुचराई केली जात आहे असे आरोप करीत १२ जून रोजी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता़ यात चार सदस्य हे शिवसेनेचे आहेत़ तर जवळपास दहा ते बारा सदस्य सरपंचांच्या विरोधात असल्याचा सूर शहरातील राजकीय वर्तुळात निघत आहे़ या अविश्वास ठरावाबाबत तहसीलदार ज्योती चौहाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी विशेष सभा होत आहे. शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता असतानाही अविश्वास ठराव दाखल करण्याची वेळ सदस्यांवर आल्याने वरिष्ठ नेतेमंडळी ऐनवेळी हस्तक्षेप करणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर)