शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकराशे कोटींची मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: July 3, 2017 00:14 IST

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.

मारोती जुंबडे। लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षांत जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस झाला. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. तसेच २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात काही भागात अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या चार वर्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला. २०१५-१६ या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठीही पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीही मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांनी बँकांकडून जवळपास १६३४ कोटींचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले.या कर्जाच्या रक्कमेतून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खत, बियाणे विकत घेऊन पेरणी केली. त्यानंतर २०१६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. परंतु, मालाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हा माल कवडीमोल दराने खरेदी केला. त्यामुळे उत्पन्न होऊनही शेतकरी कर्जबाजारीच राहिला. परिणामी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची फेड शेतकऱ्यांकडून झाली नाही. कर्जाचा डोंगर वाढत राहिला. जिल्ह्यातील शेतकरी बँकाचे थकबाकीदार झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आत्महत्येसारखे शेवटेच पाऊल उचलू लागला. शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफीची करण्याची घोषणा शासनाने केली. २८ जून २०१७ रोजी तसा आदेशही काढला. या आदेशानुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना काही निकषाच्या आधीन राहून दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बँकांचे ३० जून २०१६ पर्यंतचे थकित असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेअंतर्गत माफ होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४० हजार शेतकऱ्यांचे जवळपास ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.