शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जमावाच्या मारहाणीत जखमी असलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 13:32 IST

प्रशांत नगर येथील गोडाऊनमध्ये भंगार चोरीच्या संशयावरून मारहाण झालेल्या विजय पांडुरंग सदाफुले या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद: प्रशांत नगर येथील गोडाऊनमध्ये भंगार चोरीच्या संशयावरून मारहाण झालेल्या विजय पांडुरंग सदाफुले (वय ३६ रा . छोटा मुरलीधरनगर  ) या तरुणाचा उपचारा दरम्यान आज पहाटे मृत्यू झाला.  

या बाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी ( दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास अनिल गायकवाड, विनोद बत्तासे आणि  विजय सदाफुले हे प्रशांतनगर येथील संदीप जोशी यांच्या केटरिंग च्या गोडाऊन  मध्ये घुसल्या चे वाचमन च्या लक्षात आले . यावेळी त्याने आरडाओरडा करताच मोठा जमाव जमला. यावेळी तेथून पळून जात असताना अनिल आणि विजय जमावाच्या हाती लागले तर  विनोद पळून जाण्यात यशस्वी झाला.
 
यावेळी जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत अनिल आणि विजय गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच जमावाने त्यांना उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नेले. यानंतर पोलीसांनी जखमी विजय आणि अनिल यांना घाटी रुग्णालयात दाखल केलें . डॉक्टरांनी यावेळी अनिलला काही वेळाने डिस्चार्ज दिला. परंतु; गंभीर जखमी असलेल्या विजयला आयसीयु मध्ये  दाखल केले. तेथे उपचार सुरू असतांना विजयचा आज पहाटे मृत्यू झाला.
 
मयत विजयच्या पत्नीच्या तक्रारीवरुन अनोळखी लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा उस्मानपुरा ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड आणि पोलीस निरीक्षक सतिश टाक यांनी दिली.
  
आरोपीच्या अटकेची मागणी
 
विजय याचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यानी घाटीत धाव घेतली . यावेळी आरोपीना  अटक करा. मयताच्या नातेवाईक याना नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली.
 
आरोपी पसार 
विजयचा मृत्यू झाल्याचे कळताच मारहाण करणारे संशयित पसार झाल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. घाटीत जमाव जमताच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, ऱाहुल चव्हाण आणि कर्मचारी यांनी बंदोबस्त वाढ केली.