परतूर : परीक्षा देऊन गाडीवर परत जाताना पडून जखमी झालेल्या ‘त्या’ महिलेचा अखेर मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरूध्द परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका महाविद्यालयात परीक्षेचा पेपर देऊन दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मयत अर्चना किशोर सातपुते (२८) वर्षे, बाळू शेलार चाळ भिवंडी, ह. मु. पंचवटी मानवत ही मोटार सायकलवर मागे बसून परतत होती. मोटारसायकल चालक आरोपी पांडुरंग रूस्तूम मोगल यांने भरधाव वेगाने व हलगर्जीपणे गाडी चालवून अचानक ब्रेक दाबल्याने सदर महिला खाली पडून डोक्याला गंभीर जखमी झाली होती. जखमी महिलेस जालना, औरंगाबाद व पुढे भिंवडीकडे उपचारासाठी नेत असताना तिचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी परतूर पोलिसात जमादार शंकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
अखेर ‘त्या’ जखमी महिलेचा मृत्यू
By admin | Updated: March 21, 2016 00:15 IST