शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

By admin | Updated: January 17, 2017 23:11 IST

ज्ाालना : मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ज्ाालना : एमआयडीसी परिसरातील कैलास शटर येथील चंद्रकांत पाईकराव (४५) यांनी मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, शहरातील जुन्या जालना परिसरात असलेल्या या मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती परिसरात व्यक्त होऊ लागली आहे. मोतीबाग हे नगरपालिकेचे शहरातील एकमेव मोठे उद्यान आहे. उद्यानाच्या पाठिमागे निसर्गरम्य असा मोती तलाव आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाचे पाणी साठून रहावे यासाठी नगरपलिकेने यंदा या तलावातील गाळही काढला आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून तलावात मुबलक पाणीासाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या बोअरची पाणीपातळी वाढली आहे. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीने या तलावाच्या कडेला कसलेही संरक्षण नसल्यामुळे हा तलाव जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दीड महिन्यात तिघांनी या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यात यशवंतनगर येथील तरूण मयूर वाघ, एका महिला आणि मंगळवारी चंद्रकांत पाईकराव यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या तलावामध्ये ४० जणांनी आत्महत्या केली असल्याची माहिती परिसरातील दुकानदार सांगत आहेत. सरक्षण भींत नसल्याने सहज तलावात उडी घेता येत असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, मयुर वाघ हा आत्महत्या करण्यापूर्वी या परिसरात काही काळ फिरत होता, असेही एका व्यापाऱ्याने सांगितले. त्याचे प्रेत पाण्याबाहेर काढल्यानंतर फिरत असलेलाच हा मुलगा असल्याने आपणाला धक्का बसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तलावाला सरंक्षण भींत असणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, या घटनांना पालिका कितपत गांभिर्याने घेऊन सुरक्षिततेबाबत कार्यवाही करते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष आहे.