जालना : भोपाळ येथे इस्जतेमाला जाणाऱ्या वाहनाला बऱ्हाणपूरजवळ अपघात होऊन तीनजण ठार, तर आठजण जमखी झाले होते. दरम्यान, जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. जालन्यातील दहा तरूण जीपने शुक्रवारी रात्री भोपाळ येथील इस्तेमाला निघाले होते. पहाटे ५ वाजेच्या सुमारास जीपला भरधाव ट्रकने धडक दिली होती. जीपमधील शेख बाबा हाजी शफी तांबोळी (रा. नॅशनल नगर जालना), फय्याज खान हामेद खान (४२ रा. पेंशनपुरा जालना) व चालक ज्ञानेश्वर सिताराम भूमरे (३० रा. अंबड ) हे ठार झाले होते. आठ जण जखमी झाले होते. या जखमीतील शेख सलमान शेख महेबुब (२५ रा. दु:खीनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ अपघातातील एका जखमीचा मृत्यू
By admin | Updated: November 29, 2015 23:15 IST