शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: March 20, 2016 00:47 IST

वाशी : कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर तीच गंज पडल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला़

वाशी : कडब्याच्या गंजीला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर तीच गंज पडल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सेलू (ता़वाशी) येथे घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील सेलू येथील संतोष रामचंद्र आडसूळ (वय-३७) हा युवक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शेतात झोपायला गेला होता़ तो झोपला असता अचानक आगीच्या झळयांमुळे त्याला जाग आली़ त्यावेळी त्याच्या शेतातील कडब्याच्या गंजीला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले़ आगेचे लोळ पाहता परिसरातील अनेक नागरिकही त्या ठिकाणी जमले़ मात्र, लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संतोष आडसूळ याच्या अंगावरच पेटलेली गंज पडली़ या आगीत संतोष आडसूळ याचा जागीच होरपळून मृत्यू झाला़ याबाबत नरसिंग आडसूळ यांनी दिलेल्या माहितीवरून वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, एकीकडे सेलू व परिसरात पाणी- चारा टंचाई निर्माण झालेली असताना त्यात एका शेतकऱ्याचा पेटलेल्या कडब्याची गंज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)