शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 7, 2014 00:51 IST

औरंगाबाद : विजेचा शॉक लागून बांधकाम मजूर व एका बालिकेचा मृत्यू झाला. भारतनगर येथील तुळजाभवानी चौकात घराला लागून गेलेल्या विद्युत

औरंगाबाद : विजेचा शॉक लागून बांधकाम मजूर व एका बालिकेचा मृत्यू झाला. भारतनगर येथील तुळजाभवानी चौकात घराला लागून गेलेल्या विद्युत तारेला बांधकामावरील मजूर मुलगा चिकटला. हे दृश्य पाहून घाबरलेल्या पित्याने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघेही तारेला चिकटले. नागरिकांनी लाकडी काठीने दोघांना बाजूला केले; पण दुर्दैवाने यात मदतीसाठी धावलेला पिता जागीच ठार झाला, तर मुलगा गंभीर भाजला.हिंमतराव देवराव सोनकांबळे (५०, रा. भारतनगर) असे मयत बांधकाम मजुराचे नाव आहे. राहुल हिंमतराव सोनकांबळे (१५, रा. भारतनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. राहुलचा हात व छाती भाजली असून, त्याच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत मयत सोनकांबळे यांच्या कुटुंबियांनी मुकुंदवाडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रामेश्वर साळुंके, बांधकाम ठेकेदार गुडवाल व जीटीएलच्या अधिकाऱ्यांविरुद्ध भादंवि ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घरमालक रामेश्वर साळुंके यास अटक करण्यात आली आहे. भारतनगरमध्ये तुळजाभवानी चौकात रामेश्वर साळुंके यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गच्चीचे बांधकाम सुरू आहे. साळुंके यांनी नुकतेच हे घर विकत घेतले आहे. त्यांनी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम केल्यानंतर आता तेथे गच्ची उभारण्याचे काम सुरू आहे. गच्चीला लागून अवघ्या फुटभर अंतरावरून विजेच्या उघड्या तारा आहेत. आज सकाळीच हिंमतराव सोनकांबळे व त्यांचा मुलगा राहुल हे बाप-लेक तेथे मजूर म्हणून कामाला गेले.सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास राहुल हा गच्चीवर उभा असताना अचानक त्याचा व विजेच्या तारांचा संपर्क आला. त्यात त्याला तारांकडे ओढले गेले. त्याचा हात वरच्या तारेला चिकटला. त्यामुळे तेथे मोठा जाळ झाला. राहुल हा विजेशी झुंज देत असताना हिंमतराव यांचे लक्ष त्याच्याकडे गेले अन् क्षणाचाही विलंब न लावता ते आपल्या मुलाला वाचविण्यासाठी धावले. त्यांनी राहुलला पकडले आणि ओढण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तेही चिकटले. दोघेही गच्चीच्या भिंतीवर निपचित पडले. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वरच्या मजल्यावर धाव घेऊन लाकडी काठीने त्यांना विजेच्या संपर्कापासून दूर केले त्यावेळी हिंमतराव हे जागीच ठार झाले होते, तर त्यांचा मुलगा राहुलचा श्वासोच्छ्वास सुरू होता. नागरिकांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलीस व जीटीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर घटनेची माहिती दिली. काही वेळातच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही घाटी हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. तेथे डॉक्टरांनी हिंमतराव सोनकांबळे यांना तपासून मयत घोषित केले. राहुलवर उपचार सुरू आहेत. चौकट....वह्या-पुस्तकांसाठी गेला कामालाराहुलचा कामाचा आजचा हा दुसराच दिवस होता. तो या परिसरातील नेताजी सुभाष हायस्कूलमध्ये यंदा १० वीत शिकत आहे. सध्या सुटीचे दिवस असल्यामुळे तो घरीच होता. वह्या- पुस्तके खरेदी करण्यास मदत होईल. म्हणून वडिलांनी त्याला सोबत कामाला नेले होते. हिंमतराव सोनकांबळे यांचा राहुल हा सर्वात धाकटा मुलगा. त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत. ज्या तारेने हिंमतराव सोनकांबळे यांचा बळी घेतला तेवढीच तार उघडी आहे. या खांबावरील अन्य सर्व बाजूंच्या तारांना रबराचे वेस्टन आहे. या भागातील नागरिकांनी ‘जीटीएल’कडे या खांबावरील उघड्या तारा बदलून रबराचे वेस्टन असलेले वायर टाकण्याची अनेकदा मागणी केली होती; पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज एका निरपराध व्यक्तीचा जीव गेल्याची चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली. चौकट............उस्मानपुरा परिसरातील कबीरनगर येथे घरात विजेचा शॉक लागल्यामुळे १२ वर्षीय चिमुकलीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली. प्रियंका मिलिंद जोगदंडे असे मयत मुलीचे नाव आहे. काल सायंकाळी तिला विजेचा शॉक लागला. नातेवाईकांनी तिला तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल हिंमतराव सोनकांबळे (१५, रा. भारतनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. राहुलचा हात व छाती भाजली असून, त्याच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत मयत सोनकांबळे यांच्या कुटुंबियांनी मुकुंदवाडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रामेश्वर साळुंके, बांधकाम ठेकेदार गुडवाल व जीटीएलच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घरमालक रामेश्वर साळुंके यास अटक करण्यात आली आहे. भारतनगरमध्ये तुळजाभवानी चौकात रामेश्वर साळुंके यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गच्चीचे बांधकाम सुरू आहे. साळुंके यांनी नुकतेच हे घर विकत घेतले आहे. त्यांनी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम केल्यानंतर आता तेथे गच्ची उभारण्याचे काम सुरू आहे. गच्चीला लागून अवघ्या फुटभर अंतरावरून विजेच्या उघड्या तारा आहेत. आज सकाळीच हिंमतराव सोनकांबळे व त्यांचा मुलगा राहुल हे बाप-लेक तेथे मजूर म्हणून कामाला गेले.सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास राहुल हा गच्चीवर उभा असताना अचानक त्याचा व विजेच्या तारांचा संपर्क आला. त्यात त्याला तारांकडे ओढले गेले. हिंमतराव यांचे लक्ष त्याच्याकडे गेले अन् क्षणाचाही विलंब न लावता ते आपल्या मुलाला वाचविण्यासाठी धावले. त्यांनी राहुलला पकडले आणि ओढण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तेही चिकटले. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वरच्या मजल्यावर धाव घेऊन लाकडी काठीने त्यांना विजेच्या संपर्कापासून दूर केले त्यावेळी हिंमतराव हे जागीच ठार झाले होते, तर त्यांचा मुलगा राहुलचा श्वासोच्छ्वास सुरू होता. काही वेळातच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही घाटी हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. तेथे डॉक्टरांनी हिंमतराव सोनकांबळे यांना तपासून मयत घोषित केले. राहुलवर उपचार सुरू आहेत. कबीरनगर येथे घरात विजेचा शॉक लागल्यामुळे १२ वर्षीय चिमुकलीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली. प्रियंका मिलिंद जोगदंडे असे मयत मुलीचे नाव आहे. काल सायंकाळी तिला शॉक लागला. नातेवाईकांनी तिला तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे सायंकाळी तिचा मृत्यू झाला.वह्या-पुस्तकांसाठी गेला कामालाराहुलचा कामाचा आजचा हा दुसराच दिवस होता. तो या परिसरातील नेताजी सुभाष हायस्कूलमध्ये यंदा १० वीत शिकत आहे. सध्या सुटीचे दिवस असल्यामुळे तो घरीच होता. वडिलांनी त्याला सोबत कामाला नेले होते. हिंमतराव सोनकांबळे यांचा राहुल हा सर्वात धाकटा मुलगा. त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत. ज्या तारेने हिंमतराव सोनकांबळे यांचा बळी घेतला तेवढीच तार उघडी आहे. या खांबावरील अन्य सर्व बाजूंच्या तारांना रबराचे वेस्टन आहे. या भागातील नागरिकांनी ‘जीटीएल’कडे या खांबावरील उघड्या तारा बदलून रबराचे वेस्टन असलेले वायर टाकण्याची अनेकदा मागणी केली होती; पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.