शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

डीन, मेट्रन, वैद्यकीय अधीक्षकांचे बंगले पडले ओस

By admin | Updated: September 1, 2014 00:46 IST

औरंगाबाद : अधिष्ठाता (डीन), वैद्यकीय अधीक्षक, मेट्रन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) कॅम्पसमध्ये राहणे बंधनकारक आहे,

औरंगाबाद : अधिष्ठाता (डीन), वैद्यकीय अधीक्षक, मेट्रन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) कॅम्पसमध्ये राहणे बंधनकारक आहे, त्याबाबतचे शासन परिपत्रकसुद्धा आहे. मात्र, दहा वर्षांपासून घाटीच्या कॅ म्पसमध्ये या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या बंगल्यांत कोणीही राहत नसल्याने त्याचे रूपांतर भूत बंगल्यात झाले आहे. घाटीमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा हे दोन्ही कार्य रात्रंदिवस सुरू असते. दोन्ही बाबी एकमेकांशी पूरक आहेत. घाटीत एमबीबीएसचे सुमारे ५५० आणि एम. डी., एम. एस. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे २४० विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी घाटीच्या परिसरातच राहतात. घाटीच्या आंतररुग्ण विभागातील विविध वॉर्डात बाराशेहून अधिक रुग्ण दाखल असतात. बाह्यरुग्ण विभागात रोज १८०० रुग्ण येतात. अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ४०० हून अधिक असते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अधिष्ठाता, रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग इन्चार्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र बंगले आणि निवासस्थाने बांधलेली आहेत. एवढेच नव्हे तर वैद्यकीय शिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ, टेक्निशियन आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची निवासस्थानेही या परिसरात आहेत. या सर्वांनी या निवासस्थानात राहणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. गेल्या काही वर्षांपासून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याची रक्कम वाढल्याने बहुतेक अधिकाऱ्यांनी शहरात स्वत:ची घरे बांधली आहेत. शिवाय गृहकर्ज घेतल्याने त्यांना आयकरातही सवलत मिळते. परिणामी अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, मेट्रन, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि प्राध्यापकांनी घाटीतील आपल्या निवासस्थानाकडे पाठ फिरविली आहे. निमाले ठरले शेवटचे अधिष्ठाताअधिष्ठातांच्या बंगल्यात दहा वर्षांपासून कोणीही राहत नाही. त्यामुळे या बंगल्यात राहणारे डॉ. निमाले हे शेवटचे अधिष्ठाता ठरले. वैद्यकीय अधीक्षकांच्या बंगल्याकडे अनेक वर्षांपासून कोणीही फिरकले नसल्याने त्यास भूत बंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदही रिक्त असल्याने त्यांचे निवासस्थान वापराविना पडून आहे.बंगला वापरण्यायोग्य नाही- भोपळेघाटीचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांना बंगल्यात का राहत नाहीत, असे विचारले असता ते म्हणााले की, हा बंगला पावसाळ्यात गळतो. वापरायोग्य राहिला नाही. दहा वर्षांपासून तेथे एकही अधिष्ठाता राहिला नाही. मध्यंतरी तीन-चार वर्षे मेडिसीन विभागाचे तेथे कार्यालय होते. या बंगल्याची दुरुस्ती करण्यासंबंधी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले आहे. मात्र, त्यांनी अद्याप कोणतेही काम केले नाही.