शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पुराचा धोका

By admin | Updated: January 15, 2016 00:18 IST

जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.

जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सोबचत पुराचा धोका वाढण्याची भीती असल्याचे मत वाचकांनी सर्व्हेक्षणातून नोंदविले. नद्यांमधील अतिक्रमणाबाबत लोकमतने प्रश्नावली माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यात वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. या वाचकांना नद्यांमधील अतिक्रमणाबाबत पाच प्रश्न विचारण्यात आले. यात होय, नाही, माहीत नाही या स्वरूपात उत्तरे द्यावयाची होती. यात प्रामुख्याने नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे का? या प्रश्नावर ७० टक्के वाचकांनी होय उत्तर दिले. १० टक्के नाही तर २० टक्के वाचकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. एकूणच तब्बल ७० नागरिकांना या अतिक्रमणाचे परिणाम स्पष्ट दिसतात. नद्यांमधील अतिक्रमणाकडे पालिकेसोबतच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे? यावर ८० वाचकांनी पालिका तसेच प्रशासनावर खापर फोडून होय असे उत्तर दिले. पाच टक्के वाचकांना प्रशासनाचा दोष वाटत नाही तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. अतिक्रमणामुळे पुराचा धोका वाढतो का? या प्रश्नावर ६५ टक्के नागरिकांना वाटते धोका वाढतो. १० टक्के म्हणतात नाही तर ५ टक्के वाचकांना माहीत नाही. नद्यांमधील अतिक्रमाणास राजकीय वरदहस्त आहे का? या प्रश्नावर ४० टक्के वाचक होय म्हणतात. २० टक्के नाही म्हणतात. तर तब्बल ४० टक्के वाचकांनी नाही म्हणून या प्रश्नावर बोलणे टाळले. नद्यांमधील अतिक्रमणाबाबत पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे वाटते का? या प्रश्नावर ७० टक्के वाचक होय म्हणतात.२० टक्के वाचकांचे नाही असे उत्तर आले तर १० टक्के वाचकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. या प्रश्नांसोबतच नागरिकांनी अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी नदीक्षेत्रात जाऊ नये असे सुचविले. काही नागरिक मुद्दाहून येथे अतिक्रमण करतात. यामुळे पालिका अथवा इतर प्रशासनही काही करू शकत नाही. नदी प्रवाह व पर्यावरण पाहता नदीपात्रात झालेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढले पाहिजे अशी प्रतिक्रियाही वाचकांनी या सर्व्हे दरम्यान दिली. (प्रतिनिधी) जालना शहरातून वाहणाऱ्या सिना व कुंडलिका नदीपात्रातील दोन्ही बाजूस तसेच पात्रातही काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मोठे पथक घेऊन अतिक्रमणा पाहणी केली. नकाशा तसेच अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही अतिक्रमण जैसे थेच आहे. नद्यांमधील अतिक्रमण आहे तसेच आहे. जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी नगर पालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे सीना व कुंडलिका नद्यांमध्ये कच्च्या सोबतच पक्के बांधकाम होत आहेत. काही ठिकाणी पक्की घरेसुद्धा बांधण्यात आलेली आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही या अतिक्रमणाचा अहवाल सादर केल्यानंतरही नद्यांमधील अतिक्रमण जैसे थेच आहेत.