परभणी : लोकमत सखीमंचच्या वतीने परभणीत १८ आॅगस्ट रोजी धमाल डान्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. येथील हरिप्रसाद भवन येथे हा कार्यक्रम होत आहे.लोकमत सखीमंचच्या वतीने सखीमंच सदस्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रबोधनपर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम लोकमत सखीमंचच्या माध्यमातून केले जाते. यावर्षी देखील विविध कार्यक्रम पार पडले. गोकुळाष्टमीनिमित्त १८ आॅगस्ट रोजी धम्माल डान्स शोचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. शनिवार बाजारातील हरिप्रसाद भवन या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. ग्रुव्ह डान्स इन्स्टिट्युटचे रचित, गौरव, पराग प्रस्तुत हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात मराठी, हिंदी गाण्यावर डान्स शो होणार आहे. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त महिलांची दहीहंडी होणार असून विजेत्यांना प्रथम व द्वितीय बक्षीस दिले जाणार आहे. ग्लोरी ब्युटी पार्लरच्या लता वाजपेयी ह्या बक्षिसांच्या प्रायोजक आहेत. महिला सदस्यांनी कार्यक्रमास येताना घरुन गोपाळकाला आणावयाचा आहे. हा काला एकत्र करुन दहीहंडी साजरी केली जाणार आहे. याच कार्यक्रमात सखीमंच सदस्यांसाठी आयोजित ओम फर्निचरचा लकी ड्रॉ होणार आहे. अनिता जांगिड यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात येईल. सदस्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखीमंचने केले आहे.
सखीमंचच्या वतीने आज डान्स शो
By admin | Updated: August 18, 2014 00:32 IST