शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न नाही

By admin | Updated: June 15, 2014 00:52 IST

संजय जाधव , पैठण तब्बल २० वर्षे शिवसेनेचा अभेद्य किल्ला असलेला पैठण विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने नेट लावून पटकावला.

संजय जाधव , पैठणतब्बल २० वर्षे शिवसेनेचा अभेद्य किल्ला असलेला पैठण विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने नेट लावून पटकावला. मात्र आगामी निवडणुकीत तो राखणे राष्ट्रवादीला कठीण जाणार आहे. विद्यमान आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या विविध निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न न झाल्याने या परिस्थितीचा पुरेपूर फायदा वाघचौरे यांच्या विरोधकांना मिळाला आहे.२००९ च्या विधानसभेला शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांची चौथी वेळ होती. १५ वर्षांच्या काळात संदीपान भुमरे यांनी पंचायत समिती, जि.प., साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ व विविध सहकारातील निवडणुका जिंकून विरोधकांना जेरीस आणले होते. भुमरे यांची मक्तेदारी संपविण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय वाघचौरे यांना बळ दिले. त्यात स्वपक्षातील भुमरे विरोधकांनीही वाघचौरेंना पाठबळ दिले. त्यातच पाण्यासाठी आसुसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे स्वप्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखविले. परिणाम व्हायचा तोच झाला. संदीपान भुमरे पराभूत झाले. राज्यातून शिवसेनेला सातत्याने साथ देणाऱ्या १४ मतदारसंघांपैकी एक असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे नाव या यादीतून गळाले.संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला; मात्र हळूहळू राष्ट्रवादीचे मोहरे वाघचौरे यांच्यापासून दुरावत गेले. काँग्रेस पक्षाबरोबर संबंध सुधारण्याऐवजी बिघडण्यावरच भर देण्यात आला. परिणामी २००९ ते आजतागायत झालेल्या निवडणुकीत जि.प., पंचायत समिती, साखर कारखाना, नगर परिषद अशा विविध निवडणुकीतील वाघचौरे यांची कमाई फक्त दोन नगरसेवक आहेत. त्यातील एक आठवडाभरात काँग्रेसवासी झाला. यामुळे तालुक्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीत आमदार संजय वाघचौरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड हे आहेत. याच वेळेस काँग्रेसने या सर्व निवडणुकीत आलेख उंचावत रामनाथ चोरमले यांच्या रूपाने समाजकल्याण सभापती (जि.प.), बाबासाहेब पवार यांच्या रूपाने पंचायत समिती उपसभापतीपद पटकावले, तर पैठण नगर परिषदेवर एकहाती विजय मिळविला. शिवसेनेने माजी आमदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, संत एकनाथ साखर कारखाना, जिल्हा परिषद, नगर परिषदेत भरीव यश मिळविले. तालुक्यातील महत्त्वाचे पंचायत समिती सभापतीपद मिळविले. तालुक्यात नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती आदी महत्त्वाच्या पदांसाठी हस्तक्षेप करण्याचा अधिकारसुद्धा आ. वाघचौरे यांच्याकडे जनतेने ठेवला नाही.२०१४ च्या विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसकडून अनिल पटेल, रवींद्र काळे, रामनाथ चोरमले, बाबासाहेब पवार यांचे नाव आघाडीवर असून, रामनाथ चोरमले हे प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादीचे अनिल जाधव, अ‍ॅड. कांतराव औटे, रवींद्र शिसोदे, बद्रीनारायण भुमरे, अप्पासाहेब निर्मळ यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार संदीपान भुमरे, सोमनाथ परदेशी, विजय जाधव, प्रकाश वानोळे यांची नावे चर्चेत आहेत.