वाढवणा (बु.) : १०० ते २०० मीटर अंतरावर मोठे साठवण तलाव असून राष्टÑीय पेयजल योजना मंजूर होऊन देखील ग्रामपंचायतच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात तळपत्या उन्हात भटकंती करावे लागत आहे. उदगीर तालुक्यातील डांगेवाडी हे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या गावामधले मारोती मंदिर म्हणजे नवसाला पावणारा देव म्हणून या गावाची ओळख सर्वत्र आहे. या गावाच्या दक्षिण बाजूस १०० ते २०० मीटरवर एक मोठे साठवण तलाव आहे. त्यामुळे हा परिसर या रणरणत्या उन्हात सुद्धा हिरवागार आहे. या तलावामुळे या गावाला पाणी पुरवठा तसा चोवीस तास व्हायला पाहिजे पण ग्रामपंचायतच्या बेजबाबदारपणामुळे गावाला कृत्रिम पाणी टंचाई गेल्या २ महिन्यापासून चालू आहे. या कृत्रिम पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी १ मे रोजी सरपंच राजकुमार तरवडे व ग्रामसेवक वसुंधरा बिरादार यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले होते. पण संजय तरवडे यांनी आठ दिवसात गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थ शांत झाले. पण हा शब्द देवून १३ दिवस झाले पण परिस्थिती जैसे थे आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत सदस्यांमध्येच मतभेद असून त्यामुळेच धरण उशाला असताना सुद्धा पाण्यासाठी भटकावे लागत आहे. (वार्ताहर) तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठ्यास विलंब डांगेवाडी गावाला राष्टÑीय पेयजल योजना मंजूर झालेली असून हे काम सुद्धा जून २०१३ पासून अर्धवट अवस्थेत आहे. या छोट्याशा गावाला शासनाने पाहिजे तेवढा निधी दिला पण ग्रामपंचायतीच्या वेळकाढूपणामुळे पाणी टंचाई कायम असून याबाबत सरपंच राजकुमार तरवडे यांनी सांगितले की, काही तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब लागत आहे. आणि ग्रामसेवक वसुंधरा बिरादार या म्हणाल्या, ग्रामस्थ विकास कामात अडचणी आणत असल्यामुळे कामे होत नाहीत.
धरण उशाला अन् कोरड घशाला
By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST