शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दलित ऐक्याची वज्रमूठ !

By admin | Updated: October 15, 2016 00:28 IST

बीड : कोपर्डी (ता. कर्जत) प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे.

बीड : कोपर्डी (ता. कर्जत) प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त अन्याय-अत्याचाराविरुद्ध पहिल्यांदाच एकवटले असून विराट गर्दी होणार आहे. महिला- मुलींच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ऐक्याची वज्रमूठ आवळल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.महिनाभरापासून दलित ऐक्याची ‘मोर्र्चे’बांधणी सुरु होती. वाड्या, वस्त्या, तांड्यांवर व तालुका, शहर स्तरावर बैठका झाल्या. अन्याय- अत्याचाराविरुद्धची ही लढाई बिगर नेतृत्वाची आहे. सामान्य महिला व महाविद्यालयीन विद्याथिनी मोर्चाच्या अग्रभागी असतील. त्यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. दलित, आदिवासी व भटके विमुक्त समाजबांधव पहिल्यांदाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित येत आहेत. विविध जातींचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून पांढऱ्या रंगाचा ‘ड्रेस कोड’ असल्याने मोर्चात शिस्तीचे दर्शन घडणार आहे. मोर्चाच्या अनुषंगाने धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक गढी, मांजरसुंंबा येथून वळवली आहे. शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. दीड हजारावर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. त्यांच्या सोबत ५ हजार स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, नाष्त्याची सोय केली आहे. मोर्चाच्या पाठीमागे लगेचच स्वच्छतेसाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. (प्रतिनिधी)