शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:21 IST

परभणी : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढवून द्यावे या प्रमुख मागणीसाठी २१ जुलै रोजी परभणीत महिलांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढवून द्यावे या प्रमुख मागणीसाठी २१ जुलै रोजी परभणीत महिलांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.आयटक संलग्न असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस संघटनेच्या वतीने माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसाठी दोन वर्षांपूर्वी समिती गठीत झाली आहे. मात्र अद्यापही ५ हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे, इतर राज्यात महाराष्ट्रापेक्षा अधिक मानधन अंगणवाडी सेविकांना दिले जाते. महाराष्ट्रातही वाढ द्यावी यासाठी एप्रिल महिन्यात मुक्कामी आंदोलन केले होते, त्यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले होते. मात्र मानधन वाढीविषयी निर्णय होत नसल्याने आयटकच्या वतीने मराठवाड्यात हे आंदोलन केले जात असल्याचे माधुरी क्षीरसागर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढवून द्यावे, अशी आमची मागणी आहे. तसेच मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा चांगला असावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.एक ते दीड तास धरणे आंदोलन केल्यानंतर महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. माधुरी क्षीरसागर यांच्यासह गंगा जाधव, सीमा देशमुख, सुनीता धनले, आशा गाडे, राजश्री गाडे, अर्चना कुलकर्णी, सविता ढाले आदींसह जिल्हाभरातील सुमारे ३०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.