शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दरोडा; लाडेगावात शेतकरी दाम्पत्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:43 IST

घरासमोर झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : घरासमोर झोपलेल्या शेतकरी दाम्पत्यावर सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच महिलेच्या अंगावरील दागिन्यांसह घरातील रोख रक्कम लंपास केली. ही घटना केज तालुक्यातील लाडेगाव येथे मंगळवारी पहाटे घडली. जखमी दाम्पत्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्याप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.प्रकाश ज्ञानोबा मुळे (५०) आणि सविता प्रकाश मुळे (४२) असे या मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. प्रकाश मुळे आणि त्यांच्या पत्नी सविता हे सोमवारी रात्री घराच्या पुढे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास अंदाजे सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याकडे पैशाची मागणी करत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि पत्नीच्या अंगावरील गंठन, नथ व घरातील रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. युसूफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी प्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरून दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.