शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताचा वापराने सीताफळाची फुलली बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST

सोयगाव : पारंपरिक शेतीला बगल देत सोयगावचे युवा शेतकरी अरुण सोहनी यांनी सेंद्रीय शेतीचा अनोखा प्रयोग केला. सातत्य परिश्रमाच्या ...

सोयगाव : पारंपरिक शेतीला बगल देत सोयगावचे युवा शेतकरी अरुण सोहनी यांनी सेंद्रीय शेतीचा अनोखा प्रयोग केला. सातत्य परिश्रमाच्या जोरावर शेणखताचा भरगच्च वापर करून सीताफळ बाग फुलवून विक्रमी उत्पादन घेतले. या प्रयोगाने सोहनी यांची चांगलीच चर्चा तालूक्यात होऊ लागली आहे.

सोयगाव येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी अरून सोहनी यांनी सीताफ‌ळाची बाग मोठ्या मेहनतीने फुलविली आहे. पारंपारिक पद्धतीची शेतीतून लागवडीसाठी लावलेला खर्च देखील निघत नाही. दरवर्षी हाती काहीच उरत नसल्याचे विदारक चित्र डोळ्यासमोर दिसत होते. त्यामुळे अरूण यांनी शेतात सीताफळाची लागवड केली. त्यासाठी प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर न करता शेणखताचा अनोखा प्रयोग उपयुक्त ठरला आहे. त्यातून विक्रमी उत्पन्न घेऊन लाखो रूपयांची कमाई केली आहे.

सोहनी यांनी सर्वात प्रथम तीन हजार रुपये प्रती ट्रॉली प्रमाणे शेणखत खरेदी केले. शेतात लावलेल्या प्रत्येक झाडाला चार टोपली याप्रमाणे शेणखत दिले. पुन्हा मे महिण्यामध्ये प्रत्येकी सीताफळांच्या झाडाच्या तळाला चार टोपली गाळ व शेणखत दिले. तर तणनाशक फवारणी केली. त्याचा परिणाम हा सीताफळाच्या उत्पन्नात झालेल्या दुप्पट वाढीत दिसून आला.

-------

शेणखत टाकाल्यामु‌ळे कोणताही दुष्परिणाम यंदा जाणवला नाही. झाडांवर कोणताही प्रादुर्भाव आढ‌ळून आला नाही. त्यामुळे विक्रमी उत्पन्न हाती आले. सीताफळ बागेत घेतलेले आंतर पीकातूनही उत्पन्न मिळाले आहे. शेणखताच्या वापरामुळे सिताफळात गोडवा आणि दर्जा खूप चांगला आहे.- अरूण सोहनी, युवा शेतकरी.

-----

सोयगाव तालुक्यात सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचा मोठा ओढा वाढू लागला आहे. परिणामी विषमुक्त भाजीपाल्याला बाजारात किंमत आली आहे. शेणखतामुळे उत्पादनात देखील वाढ होऊ लागली आहे. - संगीता पवार. तालूका कृषी अधिकारी, सोयगाव.

-------

शेणखतासाठी मेंढ्या बसविल्या

शेणखताच्या उपलब्धतेसाठी शेतकरी अरुण सोहनी यांनी शेतात मेंढ्यांचे कळप बसविले. त्यामुळे जमिनीचा पत वाढण्यास मोठा फायदा झाला. जवळपास आठ दिवस मेंढ्या शेतात बसलेल्या होत्या. असेही युवा शेतकरी सोहनी यांनी सांगीतले.

-----

छायाचित्र ओळी - सेंद्रिय शेतीतून सीताफळाचे विक्रमी उत्पन्न घेतलेले शेतकरी अरुण सोहनी.