शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पतीपेक्षा बहिणीचा नवरा बरा....!

By admin | Updated: June 20, 2016 00:55 IST

औरंगाबाद : विवाहित मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीच्या नवऱ्यास फूस लावून पळवून नेल्याची घटना शहरातील सिडको भागात घडली.

औरंगाबाद : विवाहित मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीच्या नवऱ्यास फूस लावून पळवून नेल्याची घटना शहरातील सिडको भागात घडली. या घटनेने दोन्ही बहिणींचे संसार मोडकळीस आले असून लहान बहिणीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.सिडको एन-७ येथील रहिवासी सुनीता (नाव बदलले आहे) या ४० वर्षीय महिलेचा २० वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. तिचा पती शासकीय सेवेत असून तिला दोन अपत्ये आहे.तिचा एक मुलगा १८ वर्षांचा आहे. तिची २५ वर्षीय बहीण अनिता (नाव बदलले आहे) शहरातच राहते. पाच वर्षांपूर्वी अनिताचा विवाह झालेला आहे. मात्र त्यांना अद्याप अपत्य नाही. तिच्या घरी सुनीताचे सतत येणे जाणे असायचे. यातून सुनीता आणि अनिताचा पती अनिल (नाव बदलले आहे) यांच्या ‘जिजा- साली’च्या गप्पा रंगायच्या. अनिता माहेरी गेली की, अनिल सुनीताच्या घरी जेवणाच्या निमित्ताने जायचा. यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अनिता माहेरी गेलेली असताना या प्रेमीयुगुलाने पळून जाण्याचा निर्णय घेतला. पंधरा दिवसांपूर्वी अनिल आणि सुनीता घरातून पळून गेले. ही बाब जेव्हा अनिता आणि तिच्या माहेरच्या मंडळींना तसेच सुनीताचा पती आणि मुलांना कळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. प्रथम त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. सिडको ठाण्यात तक्रारशेवटी अनिता आणि तिचा भाऊ सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, तेव्हा पोलिसांनी दोघेही स्वमर्जीने गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र अनिताने तक्रार घ्यावी, यासाठी आग्रह कायम ठेवला. तेव्हा पोलिसांनी सुनीता आणि अनिल हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली. शेवटी त्यांना नाशिक येथून शोधून आणण्यात आले. त्यावेळी त्यांनी आम्ही स्वमर्जीने सोबत गेल्याचे पोलिसांना लिहून दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले. दोन कुटुंबांचा संसार मोडला...सुनीता आणि अनिल दोघेही विवाहित आहेत. पहिले लग्न झालेले असताना दुसरीसोबत घरोबा करणे गुन्हा आहे. शिवाय दुसरे लग्न करण्यापूर्वी एक तर घटस्फोट घेणे आवश्यक असते. दोघांपैकी एक जोडीदार हयात नसेल तर दुसरा विवाह करता येतो.