शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीची करवसुली!

By admin | Updated: November 12, 2016 00:32 IST

लातूर : मालमत्ता, पाणीपट्टी, एलबीटी आणि दुकान भाड्यापोटी मनपाची ४०० कोटींच्या आसपास थकबाकी आहे.

लातूर : मालमत्ता, पाणीपट्टी, एलबीटी आणि दुकान भाड्यापोटी मनपाची ४०० कोटींच्या आसपास थकबाकी आहे. वसुली मोहीम राबवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर गुरुवारी मनपाने या नोटा स्वीकारून कर भरणा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत १ कोटी ६७ लाखांचा कर भरणा केला.लातूर शहरात ७० हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ता धारकांकडे दीडशे कोटींची थकबाकी आहे. तर मनपाच्या गाळेधारकांकडे दीडशे कोटींचे भाडे थकले आहे. एलबीटी आणि पाणीपट्टीची १०० कोटींची थकबाकी आहे. अशी एकूण ४०० कोटींची थकबाकी लातूर शहरातील नागरिकांकडे आहे. या थकबाकी संदर्भात मनपाने यापूर्वी मोहीम राबविली होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी रात्री उशिरा राज्य शासनाकडून कर वसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देत असल्याचे आदेश आले. या संधीचा चांगला फायदा लातूर मनपाने घेतला. आयुक्त रमेश पवार यांनी लातूर शहरातील जनतेला ‘हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील, कर भरणा करा,’ असे आवाहन केले. शिवाय, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी शहरातून कर भरण्यासाठी जनजागरण रॅली काढली. भोंग्याद्वारे कर भरण्यासाठी दवंडी दिली. दरम्यान, बँकांमध्ये पैसे भरण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांनी कर भरणा पसंत केला. रात्री ८ वाजेपर्यंत १ कोटी ६७ लाखांचा भरणा झाला. (प्रतिनिधी)