शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३७ कोटींचा भरला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:09 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकºयांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा जवळपास ३७ कोटी रुपयांचा पीक विम्याचा हप्ता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकºयांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा जवळपास ३७ कोटी रुपयांचा पीक विम्याचा हप्ता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला आहे.नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत संबंधित पिकांचा विमा काढल्यानंतर नुकसानीच्या तुुलनेत विमा संरक्षण दिले जाते.खरीप २०१५ मध्ये तब्बल ६ लाख शेतकºयांनी आपल्या पिकांचा विमा राष्ट्रीय कृषी पीक विमा कंपनीकडे उतरविला होता. या शेतकºयांना परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४८८ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता. त्यानंतर रबी २०१५ मध्ये जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार ९४६ शेतकºयांनी ४ कोटी ५५ लाख ९ हजार २५८ रुपयांचा पीक विमा उतरविला होता. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना तब्बल १०६ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील ३८ मंडळातील ६ लाख ४७ हजार शेतकºयांनी खरीप हंगाम २०१६ चा ३६ कोटी ३८ लाख रुपयांचा पीक विमा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे भरला होता. परंतु, या हंगामात पाऊस समाधानकारक झाल्याने अनेक भागात शेतकºयांची पिके बहरली होती. त्यातून उत्पन्नही मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे ३८ मंडळापैकी केवळ १५ मंडळातीलच शेतकºयांना रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने केवळ ५० कोटी ५८ लाख रुपयांची पीक विम्याची रक्कम जिल्ह्याला मंजूर केली. उर्वरित २३ मंडळातील शेतकºयांना विमा रक्कम भरुनही पीक विमा मंजूर झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी संतप्त होऊन आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.खरीप २०१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शासनाने ५ आॅगस्टचा कालावधी पीक विमा उतरविण्यासाठी शेतकºयांना वाढवून दिला. जिल्ह्यातील ४ लाख ४६ हजार ९१८ शेतकºयांनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे जवळपास ३७ कोटी रुपयांचा पीक विमा उतरविला आहे.