शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचा घोळ कायम..!

By admin | Updated: November 25, 2015 00:18 IST

जालना : दुष्काळामुळे शेतीचे वाटोळे झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार होता. मात्र हा विमा मिळण्यासाठी अनंत अडचणी समोर येत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रिय पथकासमोर मांडली.

जालना : दुष्काळामुळे शेतीचे वाटोळे झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार होता. मात्र हा विमा मिळण्यासाठी अनंत अडचणी समोर येत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रिय पथकासमोर मांडली. एकूणच पिकांचा विमा भरूनही पैसे मिळत नसतील तर उपयोग काय, असा सवालही शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. दरम्यान काही तांत्रिक कारणामुळे शेतकरी विम्यापासून राहिले असावेत, असा अंदाज बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.जिल्ह्यात गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. खरीप तसेच रबी हंगामातून जेमतेम उत्पादन निघत आहे. काही शेतकऱ्यांची पिकेही उगवून आली नाहीत, अशा शेतकऱ्यांना विम्याचा आधार आहे. शेतकऱ्यांनी गहू (बागायती), ज्वारी (बागायती),हरभरा, करडई, ज्वारी (जिरायती) आदींचा मिळून जिल्ह्यातील चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा भरला होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार बँकांच्या सर्व शाखा मिळून १७८ कोटी रुपयांचे वाटप केले. यात राष्ट्रीयीकृत बँकांनीही १२ कोटींच्या पीक विम्याचे वाटप केल्याचे सांगितले जाते.जिल्हा मध्यवर्ती तसेच राष्ट्रीयीकृत बँका विमा वाटप केल्याचा दावा करीत असले तरी अद्यापही हजारो शेतकऱ्यांना गतवर्षीच्या रबी हंगाचा विमा मिळालेला नाही. बँका तसेच तहसीलचे खेटे मारून शेतकरी थकून गेले तरी कोणत्याही विभागास शेतकऱ्यांचे हे दु:ख समजत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी आलेल्या केंद्रीय पथकासमोर बहुतांश शेतकऱ्यांनी विम्या रक्कम मिळाली नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. (प्रतिनिधी)शेतकरी म्हणतात, आम्ही रबी तसेच खरीप हंगामाचा विमा भरला होता. संबंधित बँक तसेच भागचौकसनीस यांच्याकडे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून बँकेत विमा भरला. वर्ष उलटूनही वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम का मिळत नाही, असा संतप्त सवाल करीत आहेत. परिस्थिती नसतानाही चार ते पाच हजा रुपयांचा खर्च करून विमा भरला.याविषयी मध्यवर्ती तसेच खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, बहुतांश शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे अर्ज, मुदतीत न भरणे अथवा काही तांत्रिक चुकांमुळे विमा मिळू शकला नाही. कुणाचाही विमा हेतुपुरस्सरपणे ठेवलेला नाही.जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली असली तरी विमा संबंधी माहिती बँकेतच विचारा, असे म्हणून कृषी विभाग हात वर करीत आहे. वास्तविक पाहता कृषी विभागाकडेही परिपूर्ण माहिती असण्याची गरज आहे. मात्र, कृषी विभाग सहकार्य करीत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.